शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा धोकेबाज?

Last Updated: Tuesday, April 30, 2013 - 11:53

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्यावर पैसे लाटल्याचा आरोप आनंद सिंग यांनी लावला आहे. तब्बल ८ लाखांनी फसवल्याचा आरोप सिंग यांनी लावला आहे.
जयपूर मधील क्रिकेट आकादमीचे संचालक आनंद सिंग यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी क्रिकेट टॅलेण्ट हंट कॉन्टेस्टच्या नावाखाली त्यांचे ८ लाख रूपये लाटल्याचा आरोप त्यांच्यावर लावला आहे. कोर्टाने या तक्रारीबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

आनंद सिंग यांनी यापूर्वी शाहरूख खान आणि इरफान खान यांच्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यामुळे तक्रार नोंदवली होती. तर यावेळी त्यांच्या निशाण्यावर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा आहेत.

First Published: Tuesday, April 30, 2013 - 11:53
comments powered by Disqus