सोनाक्षीने जाहीर केलं आपलं प्रेम!

By Jaywant Patil | Last Updated: Monday, September 23, 2013 - 19:28

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलीवूडमध्ये प्रेमाच्या चर्चा नेहमीच रंगत असतात..आणि आता बॉलीवूड दबंग गर्ल सोनाक्षीनेही यावरुन पडदा उठवलाय. आपले पहिले प्रेम हृतिक रोशन असल्याचं नुकतंच तीने जाहीर केलंय.
सातवीला असताना मैत्रीणींसोबत आपण ‘कहो ना प्यार है’ बघून त्याच्यावर फिदा झाल्याचं सोनाक्षीने सांगितलं. यानंतर आपल्या संपूर्ण खोलीत सोनाक्षीने हृतिक रोशनची पोस्टर्स लावली होती. एवढंच नाही तर आजही हृतिकच आपला ड्रीम बॉय असून त्याच्यासारख्याच जोडीदाराच्या आपण शोधात असल्याचं ती म्हणाली.
एकदातरी त्याच्यासोबत या प्रवासात काम करायला मिळावं अशी तिची इच्छा आहे. यापूर्वी खास हृतिकसाठी सोनाक्षी ‘जस्ट डान्स’ या शोमध्ये आली होती. दोघांच्या वडिलांनी ‘खुदगर्ज’ सिनेमांत एकमेकांसोबत काम केलं होतं.

बॉलिवूडमध्ये कमी काळात नाव कमावत असूनही सोनाक्षी सिन्हाचं अद्याप कुठल्याही अभिनेत्याशी नाव जोडलं गेलं नाही. तसंच तिने कुठल्याही अभिनेत्याशी प्रणयदृश्यं दिली नाहीत. तरीही तिने बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. कदाचित लवकरच तिला हृतिकसोबत काम करायची संधी मिळेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 23, 2013 - 19:25
comments powered by Disqus