सोनाक्षीचं वडिलांच्या वाढदिवसासाठी ‘स्पेशल गिफ्ट’

लकी गर्ल’ सोनाक्षीचा ‘आर राजकुमार’ लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. हा सिनेमा तिच्यासाठीच नव्हे तर तिच्या वडिलांसाठीही म्हणजेच शत्रुघ्न सिन्हा यांच्यासाठीही खास ठरणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 8, 2013, 03:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘लकी गर्ल’ सोनाक्षीचा ‘आर राजकुमार’ लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. हा सिनेमा तिच्यासाठीच नव्हे तर तिच्या वडिलांसाठीही म्हणजेच शत्रुघ्न सिन्हा यांच्यासाठीही खास ठरणार आहे.
सोनाक्षी तिच्या वडिलांना वाढदिवसाचं एक खास गिफ्ट देणार आहे... आणि हे गिफ्ट म्हणजे तिचा आगामी सिनेमा... सोनाक्षी म्हणते, ‘मला अपेक्षा आहे, की माझ्या वडिलांच्या वाढदिवशी हा सिनेमा म्हणजे त्यांच्यासाठी एक चांगली भेट ठरेल. दरवर्षी काही सिनेमे प्रदर्शित होत असतात. मला अपेक्षा आहे की ‘आर राजकुमार’च्या रुपात मी त्यांना यावर्षी एक धमाकेदार बर्थडे गिफ्ट देऊ शकेन’. बुधवारी झालेल्या सिनेमाच्या म्युझिक लॉन्चिंगच्या वेळी सोनाक्षी पत्रकारांशी संवाद साधत होती.
‘आर राजकुमार’ सहा डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या अदाकाराचे वडील आणि दिग्गज अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्मदिवस ९ डिसेंबरला असतो. प्रभुदेवाच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमात सोनाक्षी सिन्हासह अभिनेता शाहिद कपूर अभिनय करताना दिसणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.