सोनाक्षी सिन्हाची नवी इच्छा, रेखासारखी भूमिका करायचेय!

By Surendra Gangan | Last Updated: Saturday, November 16, 2013 - 09:05

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दबंग आणि रावडी राठोडसारखे हिट चित्रपट देणा-या सोनाक्षीला आता आपली वेगळी ओळख निर्माण करायची आहे. दिग्गज अभिनेत्री रेखा यांनी खूनभरी माँगमध्ये साकारलेली भूमिका सोनाक्षीला साकारायची इच्छा असल्याचं तिनं म्हटलयं.
बॉलिवूडमध्ये पदार्पणातच हिट सिनेमे देणारी अभिनेत्री अशी सोनाक्षीची ओळख.. सोनाक्षीनं दबंग या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि हा सिनेमा बॉक्सऑफिसवर हिट ठरला. आणि त्यानंतर तिची दबंग गर्ल अशी ओळख तयार झाली. मात्र आता सोनक्षीला आपली इमेज बदलायची. म्हणजे आता तिला इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण करायची आहे.. १९८८ मध्ये खून भरी माँगमधील रेखा ह्यांची भूमिका लोकांच्या आजही लक्षात आहे. त्यामुळेच त्यांची खून भरी मॉग मधील अजरामर भूमिका सोनाक्षीला कऱण्याची इच्छा आहे.
रेखा या बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आहे.. त्यांच्या अभिनयावर संपुर्ण बॉलिवूड फिदा आहे.. खून भरी मॉंग या सिनेमाचा रिमेक झाल्यास त्यात आपल्याला रेखाची भूमिका करायला आवडेल असं सोनाक्षीनं म्हटलं आहे.. त्यामुळे खून भरी मॉंगचा रिमेक आला आणि त्यात सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसली तर आश्चर्य व्हायला नको.

 
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 16, 2013 - 09:05
comments powered by Disqus