अखेर शत्रूघ्न-रीना रॉयच्या अफेयरबाबत सोनाक्षी बोलली!

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा अखेर शत्रूघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या अफेयरच्या चर्चेवर बोललीय.

Aparna Deshpande | Updated: Oct 9, 2013, 04:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा अखेर शत्रूघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या अफेयरच्या चर्चेवर बोललीय.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली, “मला वाटतं माझा हे जेव्हा झालं (शत्रूघ्न सिन्हा आणि रीना रॉयचं अफेयर) तेव्हा माझा जन्म सुद्धा झाल नव्हता. मी जेव्हा मोठी होत होती, तेव्हा याबद्दल ऐकलं पण माझे वडिलांनी इतक्या वर्ष आधी केलेल्या गोष्टीबद्दल मी आता त्यांना शिक्षा देऊ शकत नाही. तो त्यांचा भूतकाळ आहे”.
माझ्या वडिलांच्या मते, “प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो. त्यामुळं याबाबत मी जास्त विचार करत नाही आणि ना ही त्याकडे लक्ष देते. यातून अनेकांना गॉसिप करण्याची संधी मिळेल. हे माझं कुटुंब आहे”.
सोनाक्षीचं रुप पुष्कळसं रीना रॉय सारखं दिसतं. त्यामुळं त्याबाबत तिला विचारलं असता तिनं दोघींमध्ये काही साम्य असल्याचं मानन्यास नकार दिला. ती म्हणाली, “मला वाटतं की मी माझ्या आई सारखी (पूनम सिन्हा) सारखी दिसते”.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.