सोनम कपूरने शेव्हिंग का केली?

सुरूवातीला मस्सकली गर्ल म्हणून लोकप्रिय झालेल्या सोनम कपूरने आता बेवकुफियापणा सुरू केला आहे.

Updated: Mar 11, 2014, 04:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सुरूवातीला मस्सकली गर्ल म्हणून लोकप्रिय झालेल्या सोनम कपूरने आता बेवकुफियापणा सुरू केला आहे.
सोनम बेवकुफियाँमध्ये बिकनीत दिसणार होती, मात्र आता सोनम शेव्हिंग करतांना दिसत आहे.
सोनमचे वडिल अनिल कपूर आपल्या केसांसाठी एकेकाळी प्रसिद्ध होते.
मात्र घाबरण्याचं काही कारण नाही, कारण सोनम कपूरला काही दाढी आलेली नाही. फोटोग्राफर रोहन श्रेष्ठने हे आगळं वेगळं फोटोशूट केलंय. आणि फेसबुकवर हे चांगलंच लोकप्रिय झालं आहे.
सोनमने आपल्या चेहऱ्यावर शेव्हिंग क्रीम लावली होती, ब्लेडने शेव्हिंग केल्यासारखी पोझ दिली होती. म्हणून दाढी नसणाऱ्यांनी सोनमच्या नादी लागून दाढी न केलेलीच बरी.
सोनमने नेमकी शेव्हिंग कशासाठी केली, असा कोणताही उच्चार फेसबुकखालील फोटोत करण्यात आलेला नाही, म्हणून सोनम कपूरचे फॅन्स जरा धास्तावले आहेत. मात्र एका फोटोशूटसाठी हा फोटो असल्याचं सांगण्यात येतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.