मातृत्वानंतर ऐश्वर्याचं `बॉलिवूड ड्रीम`, होणार पुन्हा `स्लीम-ट्रीम`

ऐश्वर्या राय बच्चनला मुलगी झाल्यापासून ती सिनेमात दिसलीच नव्हती. वेगवेगळ्या ठिकाणी तिचं जे दर्शन घडलं, त्यात ती चांगलीच जाडजूड दिसत होती. मात्र, आता पुन्हा ऐश्वर्या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येत आहे. यासाठी तिने आपल्या फिगरवर काम करण्यास सुरूवात केली आहे.

जयवंत पाटील | Updated: Sep 29, 2013, 05:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ऐश्वर्या राय बच्चनला मुलगी झाल्यापासून ती सिनेमात दिसलीच नव्हती. वेगवेगळ्या ठिकाणी तिचं जे दर्शन घडलं, त्यात ती चांगलीच जाडजूड दिसत होती. मात्र, आता पुन्हा ऐश्वर्या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येत आहे. यासाठी तिने आपल्या फिगरवर काम करण्यास सुरूवात केली आहे.
ऐश्वर्या राय बच्चन 1994 साली मिस वर्ल्ड बनली होती. तेव्हापासूनच तिच्या नाजूक आणि प्रमाणबद्ध बांध्याची तारीफ होत होती. नंतरच्या काळीत ऐश्वर्याने बॉलिवूड गाजवलं. साईज झिरो फिगरमुध्ये ती आकर्षक दिसत होती. विवाहानंतर जेव्हा ऐश्वर्या राय बच्चनच्या मुलीचा जन्म झाला, तेव्हा ऐश्वर्याने सिनेमातून ब्रेक घेतला. मातृत्वाचं सुख पुरेपूर अनुभवून आता ती पुन्हा सिनेमांतून चाहत्यांसमोर येणार आहे. ऐश्वर्याने कमबॅकची जोरदार तयारी सुरू केली आहे. तिच्या आगामी सिनेमाचं नाव ‘हॅपी अॅनिव्हर्सरी’ असं आहे. या सिनेमात तिच्यासोबत तिचा पती अभिषेक बच्चनच असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रख्यात अॅड फिल्म मेकर प्रल्हाद कक्कड करणार आहे.
मधल्या काळात ऐश्वर्याचं वाढलेलं वजन आणि बेढब शरीर हा चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. मात्र ऐश्वर्याने आपल्या फिगर पेक्षा मातृत्वाला महत्व दिल्यामुळे तिने या गोष्टींकडे दुर्वक्ष केलं. आता मात्र पुन्हा बॉलिवूड गाजवायला सज्ज झालेल्या ऐश्वर्याने आपला जुन्हा बांधा पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार व्यायाम सुरू केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.