कबीर बेदीला मुलीनं दिला जोरदार झटका...

अभिनेता कबीर बेदी आणि त्यांची मुलगी पूजा बेदी यांच्या नातेसंबंधातील तणाव आता घराचे दरवाजे खोलून अखेर बाहेर पडलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 24, 2013, 04:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता कबीर बेदी आणि त्यांची मुलगी पूजा बेदी यांच्या नातेसंबंधातील तणाव आता घराचे दरवाजे खोलून अखेर बाहेर पडलाय. गेल्या काही वर्षांत या बाप-मुलीच्या संबंधात तणाव निर्माण झाल्याची चर्चा सुरु होती. हे दोघेही काही काळापासून एकमेकांपासून दूरच राहतात. पण, दोघांच्याही नात्यातील तणाव तेव्हा समोर आला जेव्हा पूजानं आपल्या वडीलांना आपल्या आईचं- प्रतिमा बेदीचं घर सोडून जाण्याचा आदेश दिलाय.
पूजाची आई प्रतिमा बेदी यांच्या निधनानंतर कबीर आपल्या पत्नीच्याच- प्रतिमाच्याच घरात राहत आहेत. पूजा बेदी आपल्या सावत्र भावंडांच्या खूप जवळ असली, तरी तिचं तिच्या वडिलांशी मात्र जराही पटत नाही. याचं कारण म्हणजे तिच्या वडिलांची पार्टनर परवीन दुसंज... परवीन कबीरहून वयानं खूपच छोटी असली तरी ही दोघं गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र राहत आहेत.

पूजानं अगोदर काहीही चर्चा न करता एकदम आपल्या आईचं घर खाली करायला सांगितलं तेव्हा पहिल्यांदा कबीर यांना झटकाच बसला. पूजाच्या म्हणण्यानुसार परवीन एक चांगली व्यक्ती नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.