पाहा... कुणी केलंय सनी लिओनला घायाळ!

By Shubhangi Palve | Last Updated: Saturday, January 18, 2014 - 22:59

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या हॉट आणि मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी सन्नी लिओननं अनेक तरुणांना घायाळ केलंय. खुद्द सन्नीला मात्र एकाच व्यक्तीनं घायाळ केलंय.... तो म्हणजे तिचा पती डॅनियल.
बॉलीवूडमध्ये आपल्या लूक आणि हॉट फिगरने धमाल उडवून देणारी अमेरिकन देसी अभिनेत्री सन्नी लियोन प्रत्येक मुलासाठी स्वप्नांची राजकुमारी आहे; पण सन्नीच्या डोळ्यांमध्ये फक्त तिचा जीवन साथी, तिचा प्रेमळ पती डॅनियलचीच छबी आहे. यूटीव्ही स्टार्सच्या `ब्रेकफास्ट टू डिनर`च्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेत्रीने डॅनियल प्रती तिच्या प्रेमाची कबुली दिली आणि आपल्या प्रेमळ पतीविषयी गप्पाही मारल्या.
सन्नी आपल्या यशाचे श्रेय आपल्या पतीला देते. ती म्हणते, जर डॅनियल माझ्यासोबत नसते तर मी येथपर्यंत पोहोचले नसते. तिने सांगितले की ती आज जी कुणी काही आहे ते सर्वस्वी डॅनियलमुळे आहे. कारण तो जीवनातील प्रत्येक सुख-दु:खामध्ये नेहमी तिच्यासोबत असतो. आश्चळर्याची गोष्ट म्हणजे तिने कबूल केले की, मला वाटत होते की त्याने मला लग्नासाठी नकार द्यावा म्हणून मी डॅनियलसोबतच्या पहिल्या डेटसाठी उशिरा पोहोचले.` तथापि त्याचा काही उपयोग झाला नाही आणि तीन वर्षांपर्यंत एकमेकांसोबत डेटिंग केल्यानंतर सन्नी आणि डॅनियल यांनी लग्न केले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Saturday, January 18, 2014 - 22:59


comments powered by Disqus