वसीम अक्रम सुष्मिता सेन लग्नबंधनात अडकणार?

By Prashant Jadhav | Last Updated: Friday, April 12, 2013 - 14:52

www.24taas.com, दुबई
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम आणि बॉलिवुडची अभिनेत्री सुष्मिता सेन लवकरच लग्न करणार आहे. त्यानंतर ते लवकरच दुबईमध्ये सेटल होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
दरम्यान सुष्मिताच्या प्रवक्त्याने या बातमीचा इन्कार केला आहे. अक्रम आणि सुष्मिताच्या लग्नाची गोष्ट खोटी आहे. सुष्मिताचा २४ एप्रिलला मुंबईत शो आहे. मला नाही वाटत की ती शोसोबत लग्नाचेही प्लानिंग करू शकते.
एका डान्स रिएलिटी शो दरम्यान सुष्मिता आणि अक्रम यांची दोस्ती झाली होती. दोघेही आपल्या या मैत्रीला आता नवे रूप देऊ इच्छित आहे. सुष्मिताने दोन मुलींना दत्तक घेतले आहे.

सुष्मिताचे नाव बॉलिवुडच्या अनेक व्यक्तींशी जोडले गेले होते. यात विक्रम भट्ट, मुद्दसर अजीज, रणदीप हुड्डा हे सामील आहेत. बिझीनसमन इम्तियाज खत्रीसोबतही तिचे नाव जोडले गेले होते. गेल्या वर्षी सुष्मिताने घोषणा केली होती की ती पुढील वर्षी लग्न करणार आहे. मला वाटते की ही योग्य वेळ आहे. सगळ्यांना खूप वाट पाहावी लागली. अक्रम आणि सुष्मिताच्या लग्नात एक अडचण आहे की तो सध्या एका ऑस्ट्रेलियाच्या मॉडेलसोबत कराचीमध्ये राहत आहे.

First Published: Friday, April 12, 2013 - 14:51
comments powered by Disqus