येतोय चित्तथरारक 'प्रतिबिंब'!

भीती आणि रहस्याचा आगळावेगळा थरार घेऊन लवकरच थिएटरमध्ये दाखल होणारेय प्रतिबिंब हा मराठी सिनेमा... अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, लोकेश गुप्ते, सुशांत शेलार ही कलाकारांची तगडी फौज प्रतिबिंबमधल्या थराराला सामोरे जाणारेत.

Updated: Nov 29, 2011, 02:10 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

भीती आणि रहस्याचा आगळावेगळा थरार घेऊन लवकरच थिएटरमध्ये दाखल होणारेय 'प्रतिबिंब' हा मराठी सिनेमा... अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, लोकेश गुप्ते, सुशांत शेलार ही कलाकारांची तगडी फौज प्रतिबिंबमधल्या थराराला सामोरे जाणारेत...

 

'प्रतिबिंब' ही कहाणी आहे गौरी आणि जयसिंगराजे या नवदाम्पत्याची, त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या सुखी संसाराच्या स्वप्नांची. गौरी गृहप्रवेशाच्या वेळी जयसिंगराजेंच्या मृत पत्नीचा म्हणजेच वसुमतीचा फोटो पाहुन हादरते. वसुमतीचा फोटो पाहुन गौरीला स्वतःचेच प्रतिबिंब जणू आरशात पाहिल्यासारखा जाणवतं आणि  दोघींमधला एकसारखेपणातून सुरू होतो  गौरीचा पाठलाग.

 

वाड्यात घडणाऱ्या एकामागोमाग एक संशयास्पद मृत्यूने यामागचे गूढ आणखीनच वाढत जातं.  आता या घटनांमागे कुणाचा हात आहे, गौरी या अनपेक्षित घटनांना कशी सामोरे जाते,  या अनपेक्षित घडणाऱ्या घटनांचं गूढ उकलण्यात जयसिंगराजेंना यश येत का या सगळ्यांचं चित्रण प्रतिबिंब या आगामी मराठी सिनेमात करण्यात आलंय. या सिनेमात मेन लीडमध्ये आहे अंकुश चौधरी आणि सोनाली कुलकर्णी.  तर अंकुश सोनालीबरोबर संतोष जुवेकर, लोकेश गुप्ते, सुशांत शेलार, रविंद्र मंकणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. गिरीश मोहितेंनी ही फिल्म डिरेक्ट केलीय. तर सिनेमातली गाण्यांना संगीत दिलंय अवधुत गुप्तेंनी.  भीती आणि रहस्याचा चित्त थरार अनुभव देणारा प्रतिबिंब हा सिनेमा ९ डिसेंबरला रिलीज होणार आहे.