...म्हणून मी लग्न करत नाही - सलमान

सलमान खान एक अभिनेता म्हणून प्रचंड प्रसिद्धी मिळालेला असं व्यक्तिमत्व आहे. त्याची स्टाईल, त्याचं राहणं साऱ्यानाच भुरळ घालून जातं.

Updated: Dec 27, 2012, 03:29 PM IST

www.24taas.com, मुंबई
सलमान खान एक अभिनेता म्हणून प्रचंड प्रसिद्धी मिळालेला असं व्यक्तिमत्व आहे. त्याची स्टाईल, त्याचं राहणं साऱ्यानाच भुरळ घालून जातं... आज सलमान खान वयाच्या ४७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मात्र अजूनही तो अविवाहीत असल्याने त्याच्या लग्नाबाबत नेहमीच चर्चा रंगत असतात. पण अजूनही सलमान खान लग्न का करीत नाही याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे.
सलमान नेहमीच म्हणत असतो, मागील काही दिवसात ही त्याने लग्न काही नाही करीत याचं उत्तर दिलं होतं. सलमानच्या म्हणण्यानुसार त्याच्यावर अनेक केस सुरू आहेत. त्यामुळे त्याला वाटत नाही की, त्याच्या बायकोने, मुलांनी त्याला भेटण्यासाठी जेलमध्ये यावं, त्यामुळेच सलमान खान नेहमीच लग्नापासून दूर राहत असल्याचे सांगतो.
मात्र एक गोष्टी नक्की की, सलमान त्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आणि त्याचाच फायदा त्याला त्याच्या सिनेमांसाठी होतो. सलमानच्या अविवाहीत होण्यामागचं एक कारण असंही आहे की, त्याच्या बरोबरीच्य किंवा त्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या अनेक अभिनेत्रीचं लग्न झालेलं आहे.