सनी लिऑन गेली सासरी!

By Aparna Deshpande | Last Updated: Tuesday, September 24, 2013 - 10:21

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पॉर्नस्टार सनी लिऑन बिग बॉस-५ मध्ये भारतात आली अन् इथलीच झाली. जिस्म-२ मधून बॉलिवूडमध्ये एँट्री केल्यानंतर आता सध्या ती सुट्ट्यांची मजा घेतेय. मिळालेल्या माहितीनुसार तिचा नवरा डेनियल वेबरसोबत ती सध्या सासरी जर्मनीत गेलीय.
सनी लिऑनचा नवरा जर्मनीतल्या बर्लिनचा रहिवासी आहे. दोघंही बर्लिनमध्ये होणाऱ्या होलोकास्ट मेमोरिअलला प्रार्थनेत सहभागी होणार आहे. सनीच्या सासरच्या १७ सदस्यांचा दुसऱ्या महायुद्धा दरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्याच आठवणीत जर्मनीत होलोकोस्ट मेमोरिअल बनवण्यात आलंय.
एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार सनी लिऑन सुट्टीवरुन मुंबईत परतल्यावर आपल्या आगामी रागिणी एमएमएस-२ च्या गाण्याच्या शूटमध्ये बिझी होईल. सनी लिऑन ही ऑनलाईन पॉर्न इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त सर्च केली जाणारी सेलिब्रेटी आहे.
सनी लिऑनचं खरं नाव करीन मेल्होत्रा आहे. जर्मन बेकरीमध्ये सनीनं वयाच्या १५ वर्षी पहिली नोकरी केली. तिनं जवळपास ३९ पॉर्न फिल्ममध्ये काम केलंय. सनीची स्वत:ची एक वेबसाईट पण आहे. तिचा जन्म औटेंरिओ के सार्नियात झाला. सनी लिऑनची आई हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जवळच्या नाहन इथली राहणारी आहे. आईच्या निधनानंतर सनी लिऑन आपल्या वडिलांसोबत कॅलिफोर्नियातल्या लेक फॉरेस्टला शिफ्ट झाली.
सनीनं १९९९मध्ये आपलं हायस्कूलचं शिक्षण पूर्ण करुन कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली. वयाच्या ११ वर्षी तिनं पहिल्यांदा किस केलं आणि वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी वर्जीनिटी गमावली. पूजा भट्टच्या जिस्म-२मधून बॉलिवूडमध्ये एँट्री करणारी सनी सध्या रागिनी एमएमएस-२ मध्ये काम करतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 24, 2013 - 10:21
comments powered by Disqus