विद्या रंगली ‘सिद्धार्थ’च्या रंगात!

‘डर्टी गर्ल’ विद्या बालनसाठी १४ डिसेंबर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरतोय. विद्या बालन आणि यूटीव्ही सीईओ सिद्धार्थ रॉय-कपूर उद्या लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. बुधवारी विद्याचा मेहंदीचा कार्यक्रम अत्यंत खाजगी आणि साध्या पद्धतीनं पार पडला.

Updated: Dec 13, 2012, 04:06 PM IST

www.24taas.com, मुंबई
‘डर्टी गर्ल’ विद्या बालनसाठी १४ डिसेंबर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरतोय. विद्या बालन आणि यूटीव्ही सीईओ सिद्धार्थ रॉय-कपूर उद्या लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. बुधवारी विद्याचा मेहंदीचा कार्यक्रम अत्यंत खाजगी आणि साध्या पद्धतीनं पार पडला.
यावेळी विद्याच्या हातावर सिद्धर्थच्या नावाची मेहंदी लागली. पिवळ्या रंगाची साडी पारंपरिक बंगाली पद्धतीनं नेसलेली विद्या फुलांच्या दागिन्यात आणखीनच उठून दिसत होती. हा कार्यक्रम विद्याच्या खारस्थित घरी पार पडला. या सोहळ्यासाठी फक्त कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित झाले होते. या सोहळ्यासाठी रेखानं हजेरी लावून कार्यक्रमाला थोडी ग्लॅमरस केलं.
आपल्या मेहंदीच्या कार्यक्रमात विद्यानं हातभर मेहंदी न काढता फक्त तळहातावर मेहंदी काढली होती. तीही उठून दिसत होती. विद्या-सिद्धार्थचं लग्न पंजाबी आणि बंगाली दोन्ही पद्धतीनं होणार आहे. लग्नानंतर शनिवारी चेन्नईमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलंय.