पाहा... कल्की म्हणतेय, मुलीच आहेत बलात्काराला जबाबदार!

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, September 25, 2013 - 14:48

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीमध्ये पॅरामेडिकल विद्यार्थीनीवर झालेल्या गँगरेपनंतर साऱ्या देशानं अशा कृत्यांचा धिक्कार केला. पण, आत्तापर्यंत काही देशात होणाऱ्या बलात्काराच्या घटना कमी झालेल्या नाहीत. किंबहुना वेगवेगळ्या मुली आणि स्त्रियांच्या बाबतीत या घटना आणखी विकृत चेहरे घेऊन समोर येताना दिसल्या.
दिल्ली बलात्काराच्या घटनेनं लोकांनाच खडबडून जागं केलं नाही तर सरकारलाही बलात्कार विरोधी कायदा मांडण्यास भाग पाडलं. स्त्रियांच्या सुरक्षिततेबद्दल खुलेपणानं चर्चा सुरू झाल्या. पण, याच समाजात आसाराम बापूंसारख्या काही व्यक्तींना बलात्काराच्या घटनेत मुलींचीच चूक असल्याचंही दिसलं. त्यांनी या घटनांबद्दल खुलेपणानं मुलीचं वागणं आणि कपडेच या घटनांना जबाबदार असल्याचंही म्हटलं.
या समाजाचा हाच चेहरा घेऊन एका कॉमेडी ग्रुपनं अभिनेत्री कल्कि कोचलीन आणि व्ही जे जुही पांडे यांना घेऊन एक व्हिडिओ प्रसारित केलाय आणि यू ट्यूबवर या व्हिडिओनं फारच थोड्या काळात खूप प्रसिद्धी मिळवलीय. अनेकांच्या भुवया उंचवायला या व्हिडिओनं भाग पाडलंय.

कल्की आणि जुही स्त्रियाचं बलात्काराच्या घटनांना जबाबदार आहेत, असं उपहात्मक पद्धतीनं म्हणताना या व्हिडिओत दिसतात. बलात्कार करणाऱ्यांना पाठिशी घालणाऱ्यांनाही या दोघींनी चांगलंच तोंडावर पाडलंय...
यू ट्यूबवर प्रसारित झालेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत 1,305,093 वेळा पाहिलं गेलंय.
व्हिडिओ पाहा : It's Your Fault

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, September 25, 2013 - 14:39
comments powered by Disqus