बिप्सची तार हरमन बवेजाशी जुळली?

बिपाशा आता ऋतिक रोशनची कॉपी म्हणून ओळखला जाणाऱ्या हरमन बवेजाचा खूप सिरीयसली विचार करतेय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 30, 2013, 04:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता जॉन अब्राहमपासून दुरावल्यानंतर अभिनेत्री बिपाशा बसू हिला आता नवीन सोबती मिळालाय. सूत्रांच्या माहितीनुसार, बिपाशा आता ऋतिक रोशनची कॉपी म्हणून ओळखला जाणाऱ्या हरमन बवेजाचा खूप सिरीयसली विचार करतेय.

बिपाशाला आता लग्न करून खाजगी जीवनात स्थिर व्हायचंय. बिपाशाच्या जीवनात आता तिच्या जोडीदाराच्या रुपात हरमन बवेजाच्या एन्ट्री झालीय. सूत्रांच्या माहितीनुसार, बिपाशा बासू आणि हरमन बवेजा सध्या गोव्यात आपली प्रेमकहाणीची पटकथा लिहित आहेत. एका ऑनलाईन पोर्टलच्या माहितीनुसार, हॉट बिप्सला तिचा ‘मिस्टर राईट’ मिळालाय आणि यावेळी आपल्या प्रेमासाठी ती खूपच गंभीर आहे.
गोव्यात बिपाशा आणि हरमन या दोघांनी तीन दिवस एकत्र घालवले आहेत.... आणखी काही दिवस ते एकमेकांच्या सोबतीनंच घालवणार असल्याचं समजतंय. नुकतीच, बिपाशा – हरमन त्यांच्या मित्रमंडळींसोबत स्विमिंग पूलमध्ये खेळतानाचे फोटो विविध माध्यमांत झळकली होती.

जॉन अब्राहमपासून वेगळं झाल्यानंतर बिपाशाचं नाव दक्षिण भारतीय कलाकार राणा डग्गबूती याच्यासोबतही जोडलं जात होतं. यानंतर शाहिद कपूरसोबतही तिची चांगलीच गट्टी जमली होती पण ही मैत्री काही दिर्घकाळ टिकू शकली नाही. हरमनचं म्हणाल तर काही वर्षांपूर्वी त्याचं नाव प्रियांका चोप्रासोबत जोडलं जात होतं. दोघांनी ‘लव्हस्टोरी २०५०’ आणि ‘व्हाटस् युअर राशी’ या चित्रपटांत एकत्र कामही केलं होतं. सिनेमा फ्लॉप ठरल्यानंतर या दोघांचं प्रेमही फ्लॉप झालं होतं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.