करीनाने शर्मिलाला म्हटले, सासू माँ

By Surendra Gangan | Last Updated: Sunday, September 16, 2012 - 16:21

www.24taas.com,पुणे
बॉलिवूडमधील सध्या `हिरोईन` म्हणून नावारूपाला आलेली अभिनेत्री करीना कपूरने सर्वांनाच एक सुखद धक्का दिला आहे. ती आतापासूनच मन्सूर अली खान पतौडी यांची पत्नी शर्मिला हिला सासू-माँ म्हणून संबोधण्यास सुरूवात केली आहे. तिने लग्नाची वाट न बघता, होणाऱ्या सासूला सासू माँ म्हणू लागली आहे. तिच्या लग्नाला केवळ महिनाच आहे.
सैफने अमृता सिंग हिला काडीमोड दिल्यानंतर तो दुसऱ्यांदा बोहल्यावर चढत आहे. सैफ आणि करीनाचे लग्न बॉलीवूडमधील चर्चेचा विषय ठरला होता. कधी लग्न होणार याचा अंदाज लागू दिला नाही. लग्नाचे नंतर बघू आधी करिअर महत्वाचे असे म्हणत अजून विचार केला नाही, असे करीना सांगत होती. मात्र, महिन्यावर लग्न आले असताना करीनामधील सून जागी झाली आहे. ती स्वत:ला आवरू शकली नाही. तिने सैफची आई शर्मिला हिला सासू माँ, अशी हाक मारण्यास सुरूवात केली आहे.
एका दैनिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात करीनाने शर्मिला टागोर यांना सर्वांसमोर सासू माँ अशी हाक मारली. त्यावेळी सर्वांच्या नजरा खान मंडळींकडे वळल्या. यावेळी कार्यक्रमात मुलगी सोहा अली खान, करीना कपूरची बहीण करिश्मा कपूर, डिजाइनर मनीष मल्होत्रा उपस्थित होते.
करीनाने शर्मिला टागोर यांना सासू-माँ अशी हाक मारल्याचे निवदेनक वीर संघवीच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांने क्षणाचा विचार न करता, करीनाला प्रश्न केला, “तुम्ही शर्मिलांना सासू माँ असे म्हटले का?” यावर करीनानेही क्षणाचा वेळ न दवडता मी का नको म्हणू, असे प्रति उत्तर दिले. त्यानंतर `सासू माँ ` ची बाब उघड झाली.

First Published: Sunday, September 16, 2012 - 16:21
comments powered by Disqus