सलमान-रणबीरनं का टाळलं कॅटच्या बहिणीचं लग्न...

बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिच्या बहिणीचा – नताशाचा विवाहसोहळा नुकताच लंडनमध्ये पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी ना सलमान खान हजर होता... ना रणबीर कपूर... कतरीनाचे जवळचे मानले जाणारे या दोघांच्याही अनुपस्थितीविषयी आता बॉलीवूड वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 28, 2013, 02:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिच्या बहिणीचा – नताशाचा विवाहसोहळा नुकताच लंडनमध्ये पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी ना सलमान खान हजर होता... ना रणबीर कपूर... कतरीनाचे जवळचे मानले जाणारे या दोघांच्याही अनुपस्थितीविषयी आता बॉलीवूड वर्तुळात चर्चा सुरू आहे.
सुरुवातीला चर्चा होती की कतरीनानं सलमानला या लग्नाचं निमंत्रणच पाठवलं नव्हतं. परंतु, एका टॅब्लॉईडच्या माहितीनुसार कतरीनानं सलमानसहित त्याच्या संपुर्ण कुटुंबाला या लग्नात सहभागी होण्यासाठी आमंत्रण पाठवलं होतं. परंतु तरीही या लग्नाला सलमान किंवा त्याच्या परिवारातील एकही सदस्यानं या लग्नाला न जाणचं पसंत केलं.
सूत्रांच्या माहितीनुसार, सलमानची बहिण अल्वीरा आणि अर्पिता यांनाही लग्नामध्ये आमंत्रित केलं होतं. या दोघीही कतरीनाच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. पण, सलमानच्या बहिणींनीही या लग्नाला जाणं टाळलं. यामागचं कारण काय असू शकेल याविषयी जोरदार तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कतरीनाचा खास मित्र असलेला रणबीर कपूरही या लग्नसोहळ्यासाठी उपस्थित नव्हता. त्यालाही निमंत्रण मिळालं होतं. रणबीर लग्नात उपस्थित राहिला नसला तरी कतरीनाच्या बहिणीसाठी त्यानं एक सुंदर गिफ्ट पाठवलं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.