सोनाक्षी कोणत्या प्रश्नावर आणि का संतापते?

सोनाक्षी आणि शाहीद कपूरचं नाव जोडलं जात असल्याने सोनाक्षी खूप चिंतेत आहे. तसेच सोनाक्षीबाईंना लग्नाचा प्रश्न विचारला की खूप राग येतो.

Updated: Apr 10, 2014, 01:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोनाक्षी आणि शाहीद कपूरचं नाव जोडलं जात असल्याने सोनाक्षी खूप चिंतेत आहे. तसेच सोनाक्षीबाईंना लग्नाचा प्रश्न विचारला की खूप राग येतो. आर राजकुमार चित्रपट केल्यानंतर शाहीद आणि सोनाक्षीच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

शाहीदच्या प्रश्नावर सोनाक्षी प्रचंड संतापते, मी जेव्हा ही घराबाहेर निघते, तेव्हा दुसऱ्या दिवशी छापून येतं की मी, शाहीदला भेटायला गेली होती, तेव्हा मला याचा खूप राग येतो, मला आठवतंही नाही की, शेवटचं मी शाहीदशी कधी बोलले होते.
कधीही आणि केव्हाही माझं नाव शाहीदशी लिंक-अप करणं योग्य नसल्याचंही सोनाक्षी म्हणतेय. मी जिथे कुठे जाते मला हाच प्रश्न का विचारण्यात येतो, असा सवालही सोनाक्षी करते.
आपल्या परिवाराला याविषयी काय वाटतं?, यावर सोनाक्षी म्हणते, माझ्या परिवाराला मी काय आहे, काय करू शकते, यावर पूर्ण विश्वास आहे, तसेच मी शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रचारालाही जाणार नाहीय, त्यांना माझी गरज नाही आणि दुसरीकडे राजकारण हा माझा विषय नाही, माझा विषय आहे सर्वोत्तम अभिनय करणे, असं मतही सोनाक्षीने परखड शब्दात मांडलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.