लग्नाच्या बातम्या निरर्थक, झीनतनं केलं स्पष्ट

Last Updated: Thursday, February 7, 2013 - 07:50

www.24taas.com, नवी दिल्ली
सत्तरच्या दशकातील बॉलिवूडवर वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री झीनत अमान हिच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगतेय. पण, झीनतनं मात्र या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं `झी न्यूज`शी बोलताना म्हटलंय.
‘मी ना लग्न केलंय, ना माझा तसा काही विचार आहे’ असं झीनतनं झी न्यूजशी बोलताना म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून ६० वर्षांची झीनत अमान ही मुंबईतील एका ३६ वर्षीय सरफराज अहमदशी लग्न करत असल्याची चर्चा सुरु आहे. अहमद हा बिझनेसमन आणि शिवसेनेचा नेता आहे.
झीनत आणि अभिनेता संजय खान यांचं प्रेमप्रकरण बऱ्याच काळ गाजलं. त्यानंतर मात्र तीनं मजहर खान यांच्याशी लग्न केलं. पण, १९९८ साली मजहर खान यांचा मृत्यू झाला. झीनत अमान हिला दोन मुलं आहेत. अजान हा २६ वर्षांचा आहे तर जहान हा २३ वर्षांचा...

झीनतनं ‘मिस एशिया’चा खिताब जिंकल्यानंतर बॉलिवूडमध्ये आपलं पाऊल टाकलं होतं. ‘झीनत’ हा एक उर्दू शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे ‘सुंदरतेला सांभाळणं’... असंही झीनत अमान यांनी झी न्यूजशी बोलताना म्हटलंय.

First Published: Thursday, February 7, 2013 - 07:39
comments powered by Disqus