वर्ल्डकप २०१५ : भारताचा पहिलाच सामना पाकशी, 2015 World Cup: India to start title defence against Pakistan

वर्ल्डकप २०१५ : भारताचा पहिलाच सामना पाकशी

वर्ल्डकप २०१५ : भारताचा पहिलाच सामना पाकशी
www.24taas.com, झी मीडिया, दुबई
क्रिकेट वर्ल्डकप २०१५ चं वेळापत्रक जाहीर झालंय. हे सामने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये रंगणार आहेत. भारतासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचा पहिलाच सामना पाकशी रंगणार आहे.

क्रिकेट वर्ल्ड कप वेळापत्रकाची मेलबर्न आणि वेलिंग्टनमध्ये घोषणा करण्यात आली. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये आगामी वर्ल्ड कपच आयोजन करण्यात येणार आहे. भारताचा पहिला सामना १५ फेब्रुवारीला पाकिस्तानशी रंगणार आहे. तर वर्ल्डकप फायनल मॅच २९ मार्च रोजी होईल. मेलबर्नमध्ये आयसीसीचे व्हाईस प्रेसिडेंट मुस्ताफ कमाल आणि वर्ल्ड कप आयोजन समितीचे चेअरमन राल्फ वेटर्स यांनी ही घोषणा केली.

वर्ल्ड कपमधील ग्रुप्स, ठिकाण आणि वेळेची घोषणा करण्यात आली आहे. भारताला ग्रुप बीमध्ये ठेवण्यात आलंय. भारतासोबत ग्रुप बीमध्ये आहेत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बॉब्वे... तर ग्रुप ए मध्ये आहेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका. वर्ल्डकपच्या पहिल्याच दिवशी १४ फेब्रुवारी रोजी न्यूझीलंड आणि श्रीलंका तसंच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगेल. तब्बल ४४ दिवस हे सामने सुरू राहतील.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे १९९२ साली पाकिस्ताननं इम्रान खानच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या याच मेलबर्नच्या भूमिवर इंग्लंडला नमवून पहिल्यांदाच विश्वचषक आपल्या नावावर नोंदविला होता. तब्बल २३ वर्षानंतर याच मेलबर्नच्या भूमिवर पुन्हा एकदा फायनल मॅच खेळविली जाणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 30, 2013, 11:19


comments powered by Disqus