भारताला ८६ वर पहिला धक्का

टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात धडाकेबाज सुरुवात केली. लंचपर्यंत वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या सलामीवीरांनी भाराताला २१ षटकांत ८६ धावांपर्यंत मजल मारलीय. मात्र, लंचनंतर सेहवाग एकही धाव न करता तंबुद परतला.

सुरेंद्र गांगण | Updated: Dec 8, 2012, 11:49 AM IST

www.24taas.com, कोलकाता
टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात धडाकेबाज सुरुवात केली. लंचपर्यंत वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या सलामीवीरांनी भाराताला २१ षटकांत ८६ धावांपर्यंत मजल मारलीय. मात्र, लंचनंतर सेहवाग एकही धाव न करता तंबुद परतला.
सेहवागने ५६ बॉलमध्ये नाबाद ४९ तर गंभीरने ७० बॉल्समध्ये नाबाद ३३ धावा केल्या. त्याआधी इंग्लंडनं ६ बाद ५०९ धावा केल्या होत्या. आज इंग्लंडचे तळातील खेळाडू फारशी चमक दाखवू शकलेलेन नाहीत. इंग्लंडची टीम ५२३ वर ऑलआऊट झाली. मजल मारली आहे. इंग्लंडने २०७ धावांची आघाडी घेतलीय.
भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडकडून कर्णधार अॅलिस्टर कूकने (१९०), ट्रॉट (८७), कॉम्पटन (५७) आणि पीटरसन (५४) यांनी चांगली बॅटिंग केली. इंग्लंडला हादरा देताना भारताकडून ओझाने ४ तर अश्विनने ३ विकेट घेतल्या.