आयपीएल सामना सुरू असतांना आग लागते तेव्हा....

दिल्ली डेअरडेविल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात रात्री सामना पार पडला

Updated: May 6, 2014, 04:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, दिल्ली
दिल्ली डेअरडेविल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात रात्री सामना पार पडला, यात स्टेडियमच्या बाहेरील भागात अचानक आग लागल्याने, काही वेळ प्रेक्षकांमध्ये घबराट निर्माण झाली.
सामन्यात राजस्थानच्या डावातील 17 वी ओव्हर सुरू असतांना ही घटना घडली. प्रेक्षकांच्या मागे स्टेडियमच्या बाहेरील भागात आग लागलेली दिसून आली. धुराचे लोळ हवेत पसरतांना दिसून आले.
आग मोठी नसल्याने फायर ब्रिगेडने पाणीच्या फवाऱ्यांनी आग विझवली, फिरोजशहा कोटला मैदानातील आयपीएल 7 चा हा पहिला सामना होता, मात्र या घटनेमुळे चिंता आणि घबराहटीचं वातावरण तयार झालं.
मात्र लवकरच स्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या स्टेडियममधील पुढचा सामना सोमवारी दिल्ली डेअरडेविल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्या दरम्यान खेळवला जाणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.