अशोक डिंडाची ‘श्रेयसी’ने केली दांडी गुल

By Surendra Gangan | Last Updated: Friday, July 5, 2013 - 08:58

www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
टीम इंडियात अशोक दिंडाने चकमदार कामगिरी करत अनेकांनी दांडी गुल केली. मैदानावर विकेट घेणार दिंडा याची विकेट श्रेयसी रुद्रा हिने पाडली आहे.
`टीम इंडिया`चा फास्टर बॉलर्स अशोक डिंडा लग्नाच्या बेडीत अडकत आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर श्रेयसी रुद्रा हिच्याशी तो लग्नीनगाठ बांधित आहे. येत्या २२ जुलैला चिन्सुरा शहरात हा विवाह सोहळा पार पडणार असून नवविवाहित जोडप्यांचा स्वागत समारंभ २४ जुलैला होणार आहे.
एका मित्राच्या लग्नात आम्हा दोघांची ओळख झाली. पहिल्याच भेटीत आमची मते आणि मने जुळली. त्यानंतर भेटीगाठी वाढल्या. तिथूनच दोघांमध्ये नव्या नात्याची सुरुवात झाली. साधारण दोन वर्षांपूर्वी मी श्रेयसीची माझ्या आईशी भेट घडवून आणली आणि या आयपीएल हंगामाच्या दरम्यान दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, असे डिंडा याने आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगितले.

श्रेयसी साधी, सरळ आणि भोळी अशी ही मुलगी आहे. त्यामुळंच तिनं माझ्या मनात घर केलं. मी अनेक मुलींना भेटलो, मात्र श्रेयसीच्या तोडीची कोणी नव्हती, अशा शब्दांत डिंडा यानं आपल्या भावी पत्नीबद्दलच्या प्रेमभावना व्यक्त केल्या. तर श्रेयसी म्हणाली, `अशोक हा जगातील सर्वात अनरोमँटिक माणूस आहे. पण मनाने खूपच चांगला आहे.`
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, July 5, 2013 - 08:58
comments powered by Disqus