लंकेसमोर 265 चं लक्ष्य, धवनच्या ९४ धावा

ढाकात सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतानं श्रीलंकेसमोर 265 धावांचं लक्ष्य ठेवलंय. सलामीवीर शिखर धवनने दमदार 94 धावा केल्या, यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 50 षटकांत 9 बाद 264 धावांवर पोहोचली.

Updated: Feb 28, 2014, 10:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ढाका
ढाकात सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतानं श्रीलंकेसमोर 265 धावांचं लक्ष्य ठेवलंय.
सलामीवीर शिखर धवनने दमदार 94 धावा केल्या, यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 50 षटकांत 9 बाद 264 धावांवर पोहोचली.

अजंथा मेंडीसनं धवनचा 94 धावांवर त्रिफळा उडवला. मात्र शिखर धवननं दमदार फलंदाजी करत, भारताच्या डावाला नवा आकार दिला, मात्र त्याचं शतक अवघ्या सहा धावांनी हुकले.

अजिंक्य रहाणे 22 धावांवर बाद झाला. तर रोहित शर्मा केवळ 13, अंबाती रायुडू 18, दिनेश कार्तिक चार धावाच करू शकला. कर्णधार विराट कोहलीनंही 48 धावांची खेळी केली.

श्री लंकेकडून अजंथा मेंडीसनं चार, सेनानायकेनं तीन तर मलिंगा आणि डिसिल्वाला प्रत्येकी एक विकेट घेतली.
अश्विन 18 धावांवर बाद झाला तर नवोदित स्टुअर्ट बिन्नीला भोपळाही फोडता आलेला नाही. मोहम्मद शमीनं नाबाद 14 तर रवीन्द्र जाडेजानं नाबाद 22 धावा केल्या.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.