लंकेने केली अवघ्या ७४ रनमध्ये `कांगारूची शिकार`

Last Updated: Friday, January 18, 2013 - 15:09

www.24taas.com, ब्रिस्बेन
ब्रिस्बेन वन-डेमध्ये ऑस्ट्रेलिया अवघ्या ७४ रन्सवरच ऑल आऊट झाली आहे. नुआन कुलसेकराच्या भेदक माऱ्यापुढे बलाढ्य कांगारुंच काहीच चालल नाही. आणि लंकेने कांगारूंची अगदी सहजपणे शिकार केली.
कुलसेकरच्या बॉलिंगपुढे ऑसी खेळाडूंनी अक्षरश: नांगी टाकली. त्यानेच कांगारुंची अर्धी टीम पॅव्हेलियनमध्ये पाठवली. कांगारुंच्या ४० रन्सवर ९ विकेट्स गेल्या होत्या त्यामुळे ऑस्ट्रेलिया ५० रन्सच्या आतच ऑलआऊट होईल असं वाटत होतं.
मात्र, मिचेल स्टार्क आणि डोहेट्रीच्या बॅटिंगमुळेच कांगारुंना ७४ रन्सपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, वन-डेमधील कांगारुंचा ७० रन्स हा लोएस्ट स्कोअर होता.

First Published: Friday, January 18, 2013 - 11:40
comments powered by Disqus