अश्विनचे प्रमोशन तर हरभजनचे डिमोशन

भारतीय क्रिकेट बोर्डाने २०१२-२०१३ सीझनकरता भारतीय क्रिकेटर्सकरता नव्याने ग्रेडिंग सिस्टीमची घोषणा केली आहे. नव्याने जाहीर झालेल्या ग्रेड लिस्टमध्ये ऑफ स्पिनर हरभजन सिंगची ए ग्रेडमधून बी ग्रेडमध्ये हकालपट्टी करण्यात आली आहे. तर आर. अश्विनची ए ग्रेड कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये वर्णी लागली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 26, 2012, 04:19 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट बोर्डाने २०१२-२०१३ सीझनकरता भारतीय क्रिकेटर्सकरता नव्याने ग्रेडिंग सिस्टीमची घोषणा केली आहे. नव्याने जाहीर झालेल्या ग्रेड लिस्टमध्ये ऑफ स्पिनर हरभजन सिंगची ए ग्रेडमधून बी ग्रेडमध्ये हकालपट्टी करण्यात आली आहे. तर आर. अश्विनची ए ग्रेड कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये वर्णी लागली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कॅप्टन धोनी, झहीर खान, सेहवाग, गंभीर,रैना, युवराज आणि विराटसह अश्विन यांचा ए ग्रेडमध्ये समावेश आहे. ए ग्रेडमध्ये असणा-या क्रिकेटर्सना बीसीसीआय २०१२-२०१३ सीझनकरता एक कोटी रूपये देणार आहे. तर बी ग्रेडमधील क्रिकेटर्सना ५० लाख रूपये देण्यात येणार आहेत. बी ग्रेडमध्ये भज्जीसह, ईशांत शर्मा, प्रग्यान ओझा, रोहित शर्मा, पुजारा, अजिंक्य राहाणे, इरफान पठाण आणि उमेश यादवचा समावेश आहे.
बीसीसीआयच्या ग्रेडिंग सिस्टिममध्ये हरभजन सिंगची ए ग्रेडमधून बी ग्रेडमध्ये हकालपट्टी करण्यात आलीए. क्रिकेटच्या या सीझनमध्ये भज्जीची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली आहे. त्यामुळेचं त्याचं डीमोशन करण्यात आलं. तर टेस्ट,वन-डे आणि टी-२०मध्ये प्रभावी कामगिरी करणा-या आर. अश्विनला ए ग्रेडमध्ये प्रमोशन देण्य़ात आलंय.

हरभजन सिंग. टीम इंडियाचा सर्वात अनुभवी स्पिनर. आपल्या स्पिनच्या जोरावर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या भोवती एक वेगळ वलय निर्माण केलंय. मात्र, गेल्या काही सीझनमध्ये भज्जीला काही केल्या फॉर्म गवसेला नाही. आपल्या खराब फॉर्मचा फटका त्याला बीसीसीआयच्या २०१२-२०१३ग्रेडिंग सिस्टिममध्ये बसला आहे. त्याचं ए ग्रेडमधून बी ग्रेडमध्ये डिमोशन झालं आहे.
दरम्यान, हरभजनला दुखापतीमुळे इंग्लंड दौरा अर्धवट सोडून माघारी परताव लागलं होतं. त्यानंतर दुखापतीमुळे आणि खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियाता स्थान मिळण्यासाठीही झगडाव लागलं होतं. हरभजन सिंगनं पाच टेस्ट मॅचेसमध्ये ४३.५३ च्या सरासरीनं १३ विकेट्स घेतल्या आहेत. ७५ रन्स देत चार विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तर २०११ मध्ये खेळलेल्या तीन वन-डेमध्ये त्यानं चार विकेट्स घेतल्या आहेत. ३२रन्स देततीन विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
आर. अश्विननं २०११ आणि १२ सीझनमध्ये ८ टेस्ट मॅचेसमध्ये तब्बल ४९ विकेट्स घेण्याची किमया साधली. ३१ रन्स देत ६विकेट्स ही त्याची या सीझनमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. तर २०११ आणि १२ सीझनमध्ये खेळेलेल्या १९ वन-डे मॅचेसमध्ये त्यानं २६ विकेट्स घेतल्या होत्या.
आर. अश्विनच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्य़ाला ग्रेडिंग सिस्टिमध्ये प्रमोश मिळालं आहे. तर भज्जीला ढासळत्या फॉर्ममुळे बी ग्रेडमध्ये टाकण्यात आलं. आता भज्जीला पुन्हा एकदा ए ग्रेडमध्ये स्थान पटकावण्यासाठी जबरदस्त कामगिरी करून दाखवावीच लागणारए. तर आर. अश्विनला ए ग्रेडमधील आपलं स्थान कायम राखण्यासाठी कामगिरी सातत्य राखाव लागेल.