पावसाची कृपा, द. आफ्रिका सेमीफायनलमध्ये दाखल

पावसाच्या दखल आणि डकवर्थ लुईस पद्वतिच्या मजेशीर नाटकात दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडियजला मात देऊन आयसीसी चॅम्पियन्सच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 15, 2013, 12:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कार्डिक
पावसाच्या दखल आणि डकवर्थ लुईस पद्वतिच्या मजेशीर नाटकात दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडियजला मात देऊन आयसीसी चॅम्पियन्सच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवलीय.
पहिल्यांदाच पावसाच्या व्यत्ययामुळे मॅच सुरू होण्यास उशीर झाला होता. वेस्ट इंडिजला ठराविक ३१ ओव्हर्समध्ये २३१ रन्सचं टार्गेट समोर ठेवण्यात आलं होतं. २६ ओव्हर्सपर्यंत पाच विकेट गमावून १९० रन्स करण्यात वेस्ट इंडिजला यश मिळालं. पण, लक चार्मनं अखेरीस दक्षिण आफ्रिकेला कौल दिला. पुढच्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर किरोन पोलार्ड आऊट झाला आणि पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. यावेळी वेस्ट इंडिजचा स्कोअर होता २६.१ ओव्हर्समध्ये सहा विकेट आणि १९० रन्स...

डकवर्थ लुईस पद्वतिनुसार ही मॅच यावेळस बरोबरीत होती. पण, पाऊस काही थांबण्याचं नाव घेईना त्यामुळे मॅच बरोबरीत सुटल्याची घोषणा करण्यात आली. आणि उच्च रन रेटच्या जोरावर दक्षिण आफ्रिका सेमा फायनलमध्ये दाखल झाली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.