चेतेश्वर पुजाराचे सर्वोत्तम रँकिंग

ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करणा-या टीम इंडियातल्या खेळाडूंची वैयक्तिक कामगिरीही उंचावलीये. बॅट्समन चेतेश्वर पुजारा आणि ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्निन यांनी टेस्ट करिअरमधलं सर्वोत्तम रँकिंग पटकावलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 27, 2013, 05:47 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करणा-या टीम इंडियातल्या खेळाडूंची वैयक्तिक कामगिरीही उंचावलीये. बॅट्समन चेतेश्वर पुजारा आणि ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्निन यांनी टेस्ट करिअरमधलं सर्वोत्तम रँकिंग पटकावलंय.
सिरीजमध्ये ८३.८० च्या सरासरीनं ४१९ धावा कुटणारा पुजारा बाराव्या स्थानावरून सातव्या स्थानी आलाय. मॅन ऑफ द सिरीज ठरलेल्या अश्विननं सिरीजमध्ये २९ विकेट्स घेतल्यात. त्यानं आठव्या स्थानावरून ६व्या स्पॉटवर झेप घेतलीये.

महेंद्रसिंग धोनी आणि मुरली विजय यांचं रँकिंगही काहीसं सुधारलं असलं, तरी या सिरीजमध्ये फारसे फॉर्मात नसलेले सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली यांचं रँकिंगमात्र घसरलंय.