चेतेश्वर पुजाराचा पूजा पाबरीशी विवाह

टीम इंडियालतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने `व्हॅलेंटाइन डे`च्या मुहूर्तावर लग्नाच्या बेडीत अडकला. पुजारा आणि त्याची मैत्रीण पूजा पाबरी हे आज कौटुंबिक सोहळ्यात विवाहबद्ध झालेत.

www.24taas.com, नवी दिल्ली
टीम इंडियालतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने `व्हॅलेंटाइन डे`च्या मुहूर्तावर लग्नाच्या बेडीत अडकला. पुजारा आणि त्याची मैत्रीण पूजा पाबरी हे आज कौटुंबिक सोहळ्यात विवाहबद्ध झालेत.
तीन दिवस चालणाऱ्या या लग्न समारंभात बुधवारी `संगीत संध्या` कार्यक्रम झाला. पूजा ही मूळची गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील असून, तिने व्यवस्थापनात पदवी घेतली आहे.
चेतेश्वरच्या लग्नासाठी सर्व भारतीय क्रिकेटपटूंना आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) अधिकाऱ्यांनी निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामना जवळ आल्याने अनेक भारतीय क्रिकेटपटू अनुपस्थित होते. लग्नाच्या तयारीमुळे पुजाराने इराणी करंडक स्पर्धेत शेष भारत संघाकडून खेळण्याचे टाळले होते.