मोहालीत `शिखरा`वर धवन, ऑसींची वणवण

मोहालीत शिखर धवन नावाचं वादळ चांगलच घोंघावलं. धवनने आपल्या करियरमधील पहिल्याच टेस्टमध्ये नॉट आऊट 185 रन्स केल्या.

Updated: Mar 16, 2013, 06:48 PM IST

www.24taas.com, मोहाली
मोहालीत शिखर धवन नावाचं वादळ चांगलच घोंघावलं. धवनने आपल्या करियरमधील पहिल्याच टेस्टमध्ये नॉट आऊट 185 रन्स केल्या. या खेळीत त्याने काही रेकॉर्ड मोडले आणि आता तो डबल सेंच्युरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. ८५ बॉल्समध्ये टेस्ट सेंच्युरी.....२१ फोर्सची बरसात....पदार्पणात फास्टेट सेंच्युरी झळकावणारा पहिला क्रिकेटपटू....ही किमया केलीय शिखर धवन या भारताच्या नव्या ओपनर बॅट्समनने...खराब कामगिरीमुळे सेहवागला मोहली टेस्टमधून डच्चू देण्यात आला आणि शिखर धवनवर ओपनिंगची जबाबदारी सोपवण्यात आली..संधी मिळताचं त्यानं वीरूप्रमाणेच धडाकेबाज बॅटिंग केली....वन-डे आणि आयपीएलमध्ये बॉलर्सना आपल्या बॅटचा तडाख देणा-या धवनने टेस्टमध्येही आणि तेदेखील कांगारु बॉलर्सना आपल्या बॅटचा तडाखा दिला.
आपल्या करियरमधील पहिल्याच टेस्टमध्ये त्याने वन-डेसारखी तडाखेबंद खेळी करत करियरमधील पहिली-वहिली सेंच्युरी झळकावली. याशिवाय पदापर्णात सर्वाधिक १३७ टेस्ट रन्सचा विश्वनाथ गुंडाप्पांचा रेकॉर्ड त्याने मोडित काढला आणि आता पदापर्णात डबल सेंच्युरी झळकावण्याच्या उंबरठ्यावर तो येऊन ठेपलाय. शिखर धवननं १६८ बॉल्समध्ये ११०.११च्या सरासरीने १८५ रन्सची नॉट आऊट इनिंग खेळली. यामध्ये त्याने खणखणीत ३३ फोर्स आणि २ उत्तुंग सिक्स लगावले.
विशेष म्हणजे शिखर धवनदेखील सेहवाग आणि गंभीरप्रमाणे दिल्लीकर असून गंभीरप्रमाणे तो डावखुरा आहे. म्हणूनच त्याच्याकडून आक्रमक खेळाची अपेक्षा बाळगली जात असून त्यानेदेखील अपेक्षा पूर्ण करत संधीच सोन केल असच म्हणाव लागेल. मोहालीतीच त्याची इनिंग पाहिल्यावर धवनने पदार्पणातच शिखर गाठले अशी उत्सफुर्त प्रतिक्रिया क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत.