धोनी टीमइंडियातून बाहेर

वेस्टइंडीजमध्ये सुरु असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेतून भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघात असणार नाही. त्याची जागा आता विराट कोहली घेईल. तोच भारतीय कर्णधाराची जबाबदारी संभाळणार आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Jul 2, 2013, 11:39 AM IST

www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली
वेस्टइंडीजमध्ये सुरु असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेतून भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघात असणार नाही. त्याची जागा आता विराट कोहली घेईल. तोच भारतीय कर्णधाराची जबाबदारी संभाळणार आहे.
तिरंगी मालिकेतील पहिल्याच सामन्यात वेस्टइंडीजविरुद्ध धोनीच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. दुखापतीमुळे त्याला खेळने कठिण झालं आहे. दुखापतीमुळे धोनी क्षेत्ररक्षणासाठीही आला नव्हता. या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. आज मंगळवारी भारताचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

जमैकातील रुग्णालयात धोनीची चाचणी करण्यात आल्यानंतर त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे तो मायदेशी परतणार आहे. त्याच्याजागी भारतीय संघात अंबाती रायडूची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा ११ जुलैपर्यंत चालणार आहे. धोनीला स्पर्धेला मुकावे लागल्याने टीम इंडियाला धक्का बसलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.