सौरव गांगुलीचा रेकॉर्ड तोडू शकणार नाही धोनी!

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून पाहिले जाते. पण टेस्ट खेळणाऱ्या सर्व देशांविरुद्ध देशाची धुरा सांभाळणाऱ्या सौरव गांगुलीचा रेकॉर्ड तो कधीही तोडून शकणार नाही.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 16, 2013, 08:11 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून पाहिले जाते. पण टेस्ट खेळणाऱ्या सर्व देशांविरुद्ध देशाची धुरा सांभाळणाऱ्या सौरव गांगुलीचा रेकॉर्ड तो कधीही तोडून शकणार नाही. धोनीने आतापर्यंत झिम्बाब्वे विरुद्ध कधीही कर्णधारपद स्वीकारले नाही.
कॅप्टन कूल धोनी आगामी झिम्बाब्वे दौऱ्याला जाणार नाही. यापुढेही तो या देशाविरुद्ध कर्णधारपद सांभाळेल अशी स्थिती दिसत नाही. धोनी नेहमी झिम्बाब्वे दौऱ्याला जाण्यापासून दूर राहिला आहे. तो फक्त २००५ मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेला गेला होता.
यापूर्वी २०१० मधील तिरंगी मालिकेत धोनीला विश्रांती देण्यात आल्याने तो झिम्बाब्वेला गेला नव्हता. त्यावेळी सुरेश रैनाने टीमची धुरा सांभाळली होती. यावेळीही त्याला विश्रांती देण्यात आली असून विराट कोहली टीमची धुरा सांभाळणार आहे. टेस्ट सामन्यात झिम्बाब्वेशिवाय पाकिस्तान विरोधात धोनीने कॅप्टन्सी केली नाही. गांगुली एकमेव कर्णधार आहे की ज्याने टेस्ट खेळणाऱ्या सर्व संघाविरोधात एकदिवसीय आणि टेस्ट सामन्यात कॅप्टन्सी केली आहे. वन डेत तर त्याने रेकॉर्ड १४ देशांविरोधात कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तर १५ देशांच्या दर्शकांसमोर कर्णधारपद सांभाळले आहे.
राहुल द्रविडने वन डेमध्ये सर्व देशांविरोधात कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर तो कर्णधार म्हणून गेला नाही. सचिन तेंडुलकरने बांग्लादेश सोडून सर्व देशाविरोधात कॅप्टन्सी केली आहे.
धोनीला झिम्बाब्वेविरोधात केवळ मोठ्या स्पर्धांमध्ये कॅप्टन्सीचा भविष्यात चान्स आहे. पुढील तीन वर्ष क्रिकेटच्या कॅलेंडरनुसार झिम्बाब्वेविरोधात कोणतीही मॅच नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.