बॉलर्सचा फ्लॉप शो, धोनीने फोडले खापर!

भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात १४१ धावांनी झालेल्या पराभवाचे संपूर्ण खापर गोलंदाजांवर फोडलं आहे. गोलंदाजांनी योग्य लाइन आणि लेन्थने गोलंदाजी केली नाही.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 6, 2013, 09:41 AM IST

www.24taas.com, पीटीआय, जोहान्सबर्ग
भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात १४१ धावांनी झालेल्या पराभवाचे संपूर्ण खापर गोलंदाजांवर फोडलं आहे. गोलंदाजांनी योग्य लाइन आणि लेन्थने गोलंदाजी केली नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच वन-डेमध्ये टीम इंडियाचे बॉलर्सच सपशेल फ्लॉप ठरले. आफ्रिकेच्या बॅट्समनसमोर भारतीय बॉलर्सने अक्षरश: शरणागती पत्करली. मोहम्मद शमी वगळता एकाही फुल टाईम बॉलरला विकेट घेता आली नाही.
जगभरात मजबूत बॅटिंग लाईन-अपसाठी ओळखल्या जाणा-या टीम इंडियाची बॉलिंग लाईन-अप मात्र कमकुवत आहे. म्हणूनच दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर रवाना होण्यापूर्वीच भारतीय बॉलर्सची चांगलीच अग्निपरीक्षा ठरणार असल्याची चर्चा रंगली होती. अगदी त्याचप्रमाणे पहिल्याच वन-डेमध्ये भारतीय बॉलर्सना अग्निपरीक्षा द्यावी लागली आणि त्यात ते सपशेल अपयशी ठरले.
आफ्रिकेच्या बॅट्समनसमोर भारतीय बॉलर्सने अक्षरश: नांगी टाकली. हाशिम आमला, डी कॉक, एबी डिविलियर्स आणि जेपी ड्युमिनीने भारतीय बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. आफ्रिकन ग्राऊंड आणि बॅट्समनसमोर भारतीय बॉलर्सच्या मर्यादा पूर्णपणे स्पष्ट झाला. वेगाचा पत्ता नाही. अचूक आणि भेदक मारा करण्यात अपयशी ठरलेल्या बॉलर्सची दशा समुद्रामधील चहुबाजूने वादळात अडकलेल्या बोटीसारखी झाली होती.
कॅलिस सोडता आफ्रिकेचा प्रत्येक बॅट्समन भारताच्या प्रत्येक बॉलर्सवर हल्ला चढवत होता. अशा परिस्थितीत भारतीय बॉलर्स हतबल दिसत होते. मोहम्मद शमी वगळता भारताच्या एकाही फुल टाईम बॉलरला एकही विकेट घेता आली नाही. शमीलाही पहिली विकेट मिळाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. भारताला पहिली विकेट आफ्रिका 152 रन्सवर असताना मिळाली. तर कोहलीला योगायोगाने एक विकेट मिळाली.
सध्या आफ्रिका दौ-यावर असलेल्या वन-डे टीममधील ईशांत शर्मा वगळता एकाही बॉलरला दक्षिण आफ्रिकेत खेळण्याचा अनुभव नाही. यामुळेच तिथल्या वातावरणाशी आणि विकेटशी जुळवून घेण्यात भारतीय बॉलर्स कमी पडले असच म्हणाव लागेल.
तरीही झहीर खान हा अनुभवी बॉलर सध्या टीमसमवेत मेन्टॉरच्या रुपात तिकडे उपस्थित आहे. मात्र तरीही भारतीय बॉलर्सना अधिक मेहनत घ्यावी लागेल अन्यथा आफ्रिकेत सपाटून मार खाऊनच परताव लागेल असच काहीस चित्र पहिल्या वन-डेवरुन निर्माण झाल आहे.

पाहा लाइव्ह स्कोअर

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.