इंग्लडला दक्षिण आफ्रिकेचं आव्हान

By Prashant Jadhav | Last Updated: Tuesday, June 18, 2013 - 19:06

www.24taas.com, झी मीडीया, लंडन
यजमान इंग्लंड आणि द.आफ्रिकन टीम यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली सेमी-फायनल रंगणार आहे ती लंडनच्या केनिंग्टन ओव्हल ग्राऊंडवर... ग्रुप एमध्ये 4 पॉईंट्ससह टॉपवर फिनिश करणा-या इंग्लंडसमोर ग्रुप बीमध्ये सेकंड पोझिशन मिळवणारी द.आफ्रिकन टीम तगडं आव्हान ठेवण्यास सज्ज झाली आहे...
क्रिकेटचे जन्मदाते अशी ओळख असणा-या इंग्लंडला आतापर्यंत एकदाही चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपला हक्क सिद्ध करता आला नाही... तर टीममध्ये चॅम्पियन खेळाडूंचा भरणा असतानाही नेहमी चोकर्सचा शिक्का माथी मिरवणा-या द.आफ्रिकन टीमचीही इंग्लंडसारखीच स्थिती आहे... त्यामुळे इतिहास बदलण्याकरता यांपैकी कोणती टीम फायनल गाठून चॅम्पियनशीपच्या एक पाऊल जवळ जाते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे...
इंग्लंडची यंग आणि अनुभवी बॅटिंग लाईनअप सध्या चांगल्या फॉर्मात आहे...कॅप्टन ऍलिस्टर कूक दमदार कामगिरी करत असून... इयान बेलही त्यांच्याकरता महत्त्वाचा ठरत आहे.. या दोघांनी आतापर्यंत इंग्लंडला चांगला स्टार्ट दिला आहे... तर मिडल ऑर्डरमध्ये जोनाथन ट्रॉट, रवी बोपारा, नवखा जो रूट आणि इयॉन मॉर्गन परिस्थितीनूसार खेळ करण्यात एक्सपर्ट आहेत... स्टूअर्ट ब्रॉड आणि ग्रॅमी स्वानसारखे हार्ड हिटर्स मोक्याच्या क्षणी वेगाने रन्स करू शकतात... त्यामुळे इंग्लंडच्या या बॅटिंग लाईनअपला वेसण घालण्याकरता आफ्रिकन बॉलर्स सज्ज असतील...
मॉर्ने मॉर्केल जरी दुखापतग्रस्त झाला असला.. तरी त्याची जागा घेण्यास डेल स्टेन सज्ज आहे... त्याच्या सोबतीला असणार आहे तो लोनवाबो त्सोत्सोबे आणि ख्रिस मॉरिस... तर ऑलराऊंडर जोडी रॉबिन पिटरसन आणि रायन मॅक्लरेन ब्रेक थ्रू मिळवून देण्यात एक्सपर्ट आहेत... तुलनेत द.आफ्रिकन बॅटिंगही तितकीच आक्रमक आहे... आतापर्यंत हाशिम आमलाला प्रभावी कामगिरी करण्यात जरी अपयश आलं असलं... तरी कॉलिन इंग्रामच्या साथीत सेमी-फायनलमध्ये तो मोठी खेळी नक्कीच करू शकतो...
मिडल ऑर्डरमध्ये कधीही मॅच फिरवू शकणारा कॅप्टन ऍबी डि व्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, फाफ ड्यु प्लेसिस आणि डेव्हिड मिलर यांसारखी तगडी बॅटिंग लाईनअप कोणत्याही क्षणी प्रतिपस्पर्ध्यांची भंबेरी उडवण्यास नेहमीच सज्ज असते... मॅक्लरेन आणि पिटरसन हे बॅट्समन स्लॉग ओव्हर्समध्ये इंग्लंडकरता डोकेदुखी ठरू शकतात.. त्यामुळे इंग्लिश बॉलर्सना होम कंडिशनचा फायदा उचलत प्रभावी मारा करावा लागेल...
जेम्स एँडरसन, स्टूअर्ट ब्रॉड, टीम ब्रेसनन या वेगवान त्रिकूटासह ग्रॅमी स्वान आणि रवी बोपारा यांनाही मिडल ओव्हर्समध्ये अचूक बॉलिंग करावी लागेल... चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी-फायनलमध्ये तोडीसतोड टीम्स आमने-सामने येणार असल्याने फायनल कोण गाठणार याकडेच तमाम फॅन्सचं लक्षं लागलेलं असणार...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.First Published: Tuesday, June 18, 2013 - 19:06


comments powered by Disqus