फिक्सिंगबाबत नवा कायदा आणणार - सिब्बल

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील `स्पॉट फिक्सिंग`चा घोडेबाजार उघड झाल्याच्या पार्श्ववभूमीवर केवळ क्रिकेटच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमधील अशा गैरकृत्यांना रोखण्यासाठी एक स्वतंत्र आणि सर्वंकष नवा कायदा करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी जाहीर केले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 26, 2013, 07:57 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील `स्पॉट फिक्सिंग`चा घोडेबाजार उघड झाल्याच्या पार्श्ववभूमीवर केवळ क्रिकेटच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमधील अशा गैरकृत्यांना रोखण्यासाठी एक स्वतंत्र आणि सर्वंकष नवा कायदा करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी जाहीर केले.
दरम्यान, आयपीएल क्रिकेट सामन्यांमध्ये बेटिंग केल्याप्रकरणी अटकेत असलेले बी. गुरुनाथ मयप्पन यांना अतिरिक्त महानगर दंडाधिकार्यां नी २९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. जावई कोठडीत गेले असले तरी त्यांचे सासरे बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी मात्र अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. जावई मयप्पनवर आरोप असला तरी मी काही चूक केली नसल्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे श्रीनिवासन यांनी मुंबईत सांगितले.
कपिल सिब्बल म्हणालेत, विद्यमान कायद्यांत `मॅच फिक्सिंग` किंवा `स्पॉट फिक्सिंग`विरोधात कारवाई करता येईल, अशी कोणतीही सुस्पष्ट तरतूद नसल्याने यासाठी पूर्णपणे स्वतंत्र असा नवा कायदा करण्यात येणार आहे. अँटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांनीही त्यास अनुकूलता दर्शविली आहे.

भारतीय दंड संहितेत दुरुस्त्या करण्याऐवजी पूर्णपणे नवा कायदा करण्यास पसंती देण्यात येत आहे. हा नवा कायदा शक्य तेवढा व्यापक केला जाईल आणि तो केवळ क्रिकेटलाच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या क्रीडा प्रकारांना लागू असेल. नव्या कायद्याचा पहिला मसुदा तीन-चार दिवसांत तयार होईल. त्यानंतर, आणखी सल्लामसलत व तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी तो क्रीडा मंत्रालयाकडे पाठवला जाईल, अशी माहिती सिब्बल यांनी दिली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.