गौतम गंभीर काऊंटी परीक्षेत फेल

‘टीम इंडिया’मध्ये पुनरागमनासाठी काऊंटी क्रिकेटचा रस्ता धरणारा गौतम गंभीर आपल्या पहिल्याच परीक्षेत फेल ठरला. त्याच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 23, 2013, 08:13 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,कोलचेस्टर
‘टीम इंडिया’मध्ये पुनरागमनासाठी काऊंटी क्रिकेटचा रस्ता धरणारा गौतम गंभीर आपल्या पहिल्याच परीक्षेत फेल ठरला. त्याच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली.
इसेक्सकडून नॉर्दम्पटनशायरविरुद्ध खेळताना सलामीवीर गंभीर फक्त ३१ धावा करू शकला.हिंदुस्थानात ‘ऑफ सिझन’ असल्यामुळे फलंदाजीच्या टचमध्ये राहण्यासाठी गंभीरने काऊंटी क्रिकेटचा रस्ता धरला आहे. प्रख्यात इसेक्स काऊंटीकडून खेळत आहे.
काऊंटी चॅम्पियनशिप (डिव्हिजन दोन)मध्ये खेळताना नॉर्दम्पटनशायरच्या पहिल्या डावातील ५३१ धावांना उत्तर देताना इसेक्सने पहिल्या डावात ४५ षटकांत ५ बाद १८७ धावा केल्या. तर गौतम गंभीरने ६७ चेंडूंत ३१ धावा केल्या आहेत. फलंदाजधार्जिण्या खेळपट्टीवर गौतम धावांबाबत ‘गंभीर’च राहिला.
यापूर्वी नॉर्दम्पटनशायरने कर्णधार स्टिफन पीटर्स (१०१) आणि डेव्हिड सेल्स (१३१) यांच्या शतकी खेळींच्या जोरावर ५३१ धावा केल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.