धोनीची ही टीम काहीही कामाची नाहीये- गावसकर

Last Updated: Wednesday, October 31, 2012 - 13:51

www.24taas.com, मुंबई
`भारतीय क्रिकेट टीमच्या सध्याचा फॉर्म पाहता धोनीचा हा संघ गेल्या तीन दशकांतील सर्वात कमकुवत संघ आहे`. अशी तोफ माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी डागली आहे. ज्या दौर्‍याला इंग्लंड ‘संघर्षपूर्ण’ समजतो तो त्यांच्यासाठी अत्यंत सोपा असेल, असा स्ट्रेट ड्राइव्ह लगावला आहे. संघाची फलंदाजी अत्यंत ढिसाळ आहे. त्यातच आपले मध्यमगती गोलंदाजीचे आक्रमणसुद्धा अत्यंत निष्प्रभ असेच आहे.
थोडक्यात, ‘फिरकी गोलंदाजी’चा अपवाद वगळता संघात सर्व काही आनंदी आनंद आहे असे गावसकर म्हणाले. २०११ च्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यात आपली जेवढी नाजूक अवस्था होती त्यापेक्षाही वाईट अवस्थेतून आपण सध्या जात आहोत... इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यात आपण ८-० असे पराभूत झालो. त्या दोन्ही दौर्‍यात एकाही दिवसाच्या खेळावर आपले प्रभुत्व नव्हते.
इंग्लंडच्या दौर्‍यावर जाण्यापूर्वी आपण ‘नंबर वन’वर होतो, परंतु इंग्लंड दौर्‍यावर आपण ‘व्हाईटवॉश’ तर स्वीकारलाच त्याबरोबर ‘नंबर वन’ स्थानसुद्धा गमावले, असे गावसकर यांनी स्पष्ट केले.

First Published: Wednesday, October 31, 2012 - 13:45
comments powered by Disqus