वेस्टइंडीज दौऱ्यानंतर धोनीने कोणाबरोबर केली मजा

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, July 18, 2013 - 16:11

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
वेस्टइंडीज दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी मैदाना बाहेरही मौजमजा केली. आघाडीवर होता तो कर्णधार महेंद्र सिंग धोनी. त्याने समुद्रात मनसोक्त पोहून घेतले. त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती.
वेस्टइंडीज दौऱ्यानंतर काही खेळाडूंनी आराम करणे पसंत केले. तर काहींनी सुट्टीची मौजमजा केली. काही जण न्यूयॉर्कमध्ये हॉर्स राइडिंग केले. तर काही जाहिरात शुटींगमध्ये मग्न आहेत. तर काहींनी सिनेमा पाहण्याला पसंती दिली. हे सर्व होत असताना आठ खेळाडूंनी आपली सुट्टी घालवताना कशी केली मौजमजा.

महेंद्रसिंग धोनीने आपली सुट्टी न्यूयॉर्कमध्ये घालवली. कारण त्याला आपल्या सुट्टीत कोणाचा व्यत्यय नको होता. त्याच्यासोबत तिची सहचारणी होती.
तर विराट कोहली आपल्या शुटींगमध्ये मग्न होता. वेस्टइंडीज दौऱ्यानंतर आगामी जाहिरातचे त्याचे शुटींग सुरू आहे. सुरेश रैना हा आपल्या नविन घराच्या सजावटीमध्ये मग्न आहे. सुट्टी संपण्याआधी त्याला आपले घर सजवायचे आहे.
सर रवींद्र जडेजा आपल्या लाडक्या घोडीबरोबर वेळ घालवत आहे. गंगा नदीच्या किनारी तो हॉर्सराइडिंग करीत आहे.

फास्टर बॉलर इशांत शर्मा आपला वेळ सिनेमा बघण्यात घालवत आहे. तो आपल्या लाडक्या भाचीबरोबर घरात मौजमजा आणि मस्ती करण्यात आपली सुट्टी साजरी करीत आहे. तर शिखर धवन पत्नी आयशा मुखर्जीबरोबर सुट्टी साजरी करीत आहे. शिखर धवनने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कमाल करीत धमाल केली.

रोहित शर्मा थेट मुंबईत दाखल झाला. तो मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा आनंद लुटत आहे. मी मुंबईतला पाऊस वेस्टइंडीजमध्ये असल्याने मिस केला. तर फिरकी बॉलर आर अश्विन याने घरीच राहणे पसंत केले. तो सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सिरीजचा आनंद टीव्हीवर लुटत आहे. दुसऱ्या टेस्टनंतर तो खूपच आनंदी आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Thursday, July 18, 2013 - 16:09


comments powered by Disqus