झिम्बाब्वे X भारत : `कॅप्टन` विराटची आज कसोटी

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, July 24, 2013 - 13:38

www.24taas.com, झी मीडिया, हरारे
झिम्बाब्वे दौऱ्यात पाच एकदिवसीय मॅचमधील पहिली मॅच खेळण्यासाठी भारतीय टीम सज्ज झालीय. आज होणाऱ्या पहिली मॅच आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न या दौऱ्याचा कॅप्टन विराट कोहलीचा असेल.
झिम्बाब्वेच्या तुलनेत टीम इंडियाचं पारड जड आहे. टीम इंडिया आणि झिम्बाब्वे दरम्यान आत्तापर्यंत झालेल्या मॅचेसवर नजर टाकल्यास टीम इंडियानेच अधिक विजय साकारले आहेत. म्हणूनच टीम इंडियाच सीरिजवर कब्जा करेल अशी आशा भारतीय क्रिकेटप्रेमींना वाटतेय. दरम्यान अनुभवी प्लेअर्सच्या गैरहजेरीत आता युवा प्लेअर्सना आपली छाप सोडण्याची ही नामी संधी चालून आलीय. अनुभवी प्लेअर्सना वगळून युवा टीमची मोट बांधून झिम्बाब्वे दौऱ्यावर धाडण्याचा सिलेक्शन कमिटीने कौतुकास्पद निर्णय घेतलाय. झिम्बाब्वेसारख्या टीमला त्यांच्याच देशात पराभूत करुन सिलेक्शन कमिटीवर प्रभाव पाडण्याची युवा प्लेअर्सना ही नामी संधी आहे. टीम इंडियाच्या तुलनेत झिम्बाब्वे टीम ही कमकुवत मानली जाते. यामुळेच चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ट्राय सीरिजच्या विजेतेपदानंतर टीम इंडिया झिम्बाब्वेलादेखील त्यांच्याच देशात पराभूत करुन विजयाची हॅटट्रिक साधेल, अशी आशा भारतीय क्रिकेटप्रेमींना वाटतेय.
आत्तापर्यंत टीम इंडिया आणि झिम्बाब्वे दरम्यान एकूण ५१ वन-डे मॅचेस खेळल्या गेल्या आहेत. यातील ३९ वन-डेमध्ये टीम इंडियाने विजय साकारलाय तर केवळ १० वन-डेमध्येच झिम्बाब्वे विजय मिळवून शकली आहे. तर दोन मॅचेस या टाय झालेल्या आहेत. यातील १२ मॅचेस या झिम्बाब्वेमध्ये खेळल्या गेल्या असून यातील ८ मॅचेस या भारताने जिंकल्या आहेत तर ४ मॅचेसमध्ये झिम्बाब्वे विजय मिळवू शकली आहे.

या आकड्यांवर नजर टाकल्यास टीम इंडियाचचं पारड जड दिसत असून पाच वन-डेच्या सीरिजमध्ये टीम इंडियाच बाजी मारेल, अशी खात्री भारतीय क्रिकेटफॅन्सला आहे. महेंद्र सिंग धोनीच्या गैरहजेरीत विराट कोहली टीम इंडियाचं नेतृत्व करणार असून त्याच्यासमोर सीरिज जिंकण्याचं आव्हान असेल. तर आर. अश्विन, ईशांत शर्मा, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमारच्या गैरहेजरीत युवा बॉलर्ससमोर आपल्या कामगिरीची छाप सोडण्याचं आव्हान असेल. आता अनुभवी प्लेअर्सच्या गैरहजेरीत जबरदस्त कामगिरी करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी टीममधील प्रत्येक प्लेअरचा कस लागणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 24, 2013 - 10:59
comments powered by Disqus