इंग्लंडने तिसरी कसोटी जिंकली

इंग्लंडकडून भारताचा सात विकेटने पराभव झाला. चार कसोटी मालिकेत २-१ ने इंग्लंडची आघाडी झाली आहे. शेवटच्या दिवशी तीन विकेट गमावून ४१ रन्सची टार्गेट पूर्ण केलं आणि मालिकेत आघाडी घेतली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 9, 2012, 10:19 AM IST

www.24taas.com, कोलकता
इंग्लंडकडून भारताचा सात विकेटने पराभव झाला. चार कसोटी मालिकेत २-१ ने इंग्लंडची आघाडी झाली आहे. शेवटच्या दिवशी तीन विकेट गमावून ४१ रन्सची टार्गेट पूर्ण केलं आणि मालिकेत आघाडी घेतली.
इंग्लंडला तिसरा धक्का आर अश्विनने दिला. त्यांने केविन पिटरसनची विकेट घेतली. तर इंग्लंडला दुसरा धक्का प्रग्यान ओझाने दिला. त्यांने ट्रोट विकेट घेतली. तर त्या आधी आर अश्विनने अॅलिस्टर कूकला १ रन्सवर आऊट केलं.
तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव अटळ असताना आर अश्विनने झुंजार खेळी करत ९१ रन्स ठोकल्यात. प्रग्यान ओझा केवळ ३ धावांवर बाद झाल्याने आर. अश्विठनचे शतक हुकले. भारताचा दुसरा डाव २४७ रन्सवर संपुष्टात आला. इंग्लंडसमोर विजयासाठी ४१ रन्सचे माफक लक्ष्य ठेवण्यात आले होते.

ईडन गार्डनच्या ज्या खेळपट्टीवर इंग्लिश फलंदाजांनी पाचशेपेक्षा जास्त रन्स केल्या, त्याच खेळपट्टीवर भारतीय फलंदाज दोनदा स्वस्तात बाद झाले.
दुसऱ्या डावात बिनबाद ८६ धावसंख्येवरून भारताचा डाव ८ बाद १५८ असा गडगडला. प्रमुख फलंदाज नांगी टाकत असताना अश्विननने एकाकी लढत देताना अर्धशतक करीत डावाचा पराभव टाळला. त्याच्या प्रयत्नानेच चौथ्या दिवशीचे पराभवाचे मरण पाचव्या दिवशी ढकलले गेले. चौथ्या दिवसअखेरीला भारताने ९ बाद २३९ रन्स केल्या.