कांगारू पुन्हा एकदा गडबडले, शेपटाने सावरले

चौथ्या आणि अखेरच्या दिल्ली टेस्टच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्स गमावत 231 रन्स केल्या आहेत. आर. अश्विनने कांगारुंना पुन्हा दणका देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

Updated: Mar 22, 2013, 07:28 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
चौथ्या आणि अखेरच्या दिल्ली टेस्टच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्स गमावत 231 रन्स केल्या आहेत. आर. अश्विनने कांगारुंना पुन्हा दणका देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जाडेजा आणि ईशांत शर्माने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. भारतीय बॉलर्ससमोर ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर गडगडली. मात्र, कांगारुंच्या लोअर ऑर्डर बॅट्समनने पुन्हा भारताला सतावलं.
दिवसअखेर पीटर सिडल 47 तर जेम्स पॅटिन्सन 11 रन्सवर नॉट आऊट असून त्यांनी नवव्या विकेटसाठी नॉट आऊट 42 रन्सची पार्टनरशिप केलीय. दरम्यान क्लार्कच्या गैरहजेरीत वॉटसनकडे कॅप्टन्सी सोपवण्यात आलीय. सीरिजवर 3-0 नं विजयी आघाडी घेतलेल्या टीम इंडियाला कांगारुंना व्हाईटवॉश देण्याची ही सुवर्णसंधी आहे.
पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची 8 आऊट 231 अशी अवस्था केली, ती अश्विन-जाडेजा आणि ईशांत शर्माच्या अचूक बॉलिंगमुळे... ईशांत शर्मानं 2 विकेट्स घेतल्या..ईशांतनं धोकादायक डेव्हिड वॉर्नर आणि फिल ह्युजेसची विकेट काढली. तर आर अश्विननंही स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, एड कोवेन आणि मिचेल जॉन्सनची विकेट काढली. जाडेजानंही मॅक्सवेल आणि कॅप्टन वॉट्सनला आऊट केलं...