भारत ५०३ रन्सवर ऑलआऊट

भारतीय क्रिकेट टीमने दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करताना तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा डाव कोसळला. ५०३ रन्सवर टीम ऑलआऊट झाली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 4, 2013, 03:01 PM IST

www.24taas.com, हैदराबाद
भारतीय क्रिकेट टीमने दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करताना तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा डाव कोसळला. ५०३ रन्सवर टीम ऑलआऊट झाली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डाव्यात २६६ रन्स केल्या होत्या. त्याला टीम इंडियाने चांगले उत्तर दिले. चेतेश्वर पुजारा (२०४) आणि मुरली विजय (१६७) यांनी शानदार शतकी भागिदारी केली.

सलामीला मिळालेल्या दुसऱ्या संधीचा अचूक फायदा करून घेणारा मुरली विजय आणि मधल्या फळीतील जबाबदारी समर्थपणे पेलण्याची क्षमता सिद्ध करणारा चेतेश्वरर पुजारा यांनी झळकाविलेल्या नाबाद शतकांमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातही भारताने चांगली कामिगरी केली. मात्र, ही जोडी फुटल्यानंतर भारताचा डाव गडगडला.
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जखडून ठेवल्यानंतर रविवारी मुरली विजय आणि चेतेश्वदर पुजारा यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पुरती दमछाक केली. विजय आणि पुजारा या जोडीला जखडून ठेवल्याचा आनंद भलेही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी उपाहाराला साजरा केला.
वीरेंद्र सेहवागची विकेट गमावून भारताने पहिल्या दोन तासांच्या खेळात अवघ्या ४९ धावांची भर घातली होती. हैदराबादमधील ३४ अंश सेल्सिअस तापमान खेळाडूंची शारीरिक कसोटी बघत होते. खेळपट्टी कोरडी झाली होती. अशा वेळी विजय आणि पुजारा यांनी खेळपट्टीवर टिकून राहणे पसंत केले.