भारत-पाक मालिका - टीम इंडियाची घोषणा

भारतात पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आलीय. वन-डे संघात बदल करण्यात आलाय. तर ट्वेंटी-२० संघात फारसा बदल करण्यात आलेला नाही.

www.24taas.com, मुंबई
भारतात पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आलीय. वन-डे संघात बदल करण्यात आलाय. तर ट्वेंटी-२० संघात फारसा बदल करण्यात आलेला नाही.
संघ निवड जाहीर करण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सचिन तेंडुलकर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत असल्याचे वृत्त जाहीर केले. त्यामुळे सचिन पाकिस्तानविरुद्धची मालिका खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. तर युवराज सिंगला दोन्ही संघात जागा देण्यात आली आहे. मात्र, हरभजनसिंग आणि झहीर खान यांना वगळण्यात आले आहे.
टीम इंडियाचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनीकडे कायम ठेवण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध खेळविण्यात आलेला ट्वेंटी-२० संघ कायम ठेवण्यात आला असून, एकदिवसीय संघात बदल करण्यात आले आहेत. एकदिवसीय संघात बंगालकडून खेळत असलेला २२ वर्षीय जलदगती शमी अहमद या नव्या चेहऱ्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर भुवनेश्वर कुमार आणि फिरकीपटू अमित मिश्रा यांना पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे.
वन-डे संघ
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, युवराजसिंग, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, रोहित शर्मा, सुरेश रैना, विराट कोहली, अशोक डिंडा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, शमी अहमद, अमित मिश्रा.
ट्वेंटी-२० संघ
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, विराट कोहली, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, गौतम गंभीर, युवराजसिंग, रोहित शर्मा, अशोक डिंडा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, परविंदर अवाना, पियुष चावला, अंबाती रायडू.