टीम इंडियाला द.आफ्रिकेचे तगडे आव्हान

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, June 6, 2013 - 12:24

www.24taas.com, झी मीडिया, कार्डिफ
इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरूवात होणार आहे ती ग्रुप बीमधील भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका मॅचने. वर्ल्ड चॅम्पियन भारताने दोन्ही प्रॅक्टिस मॅचेसमध्ये विजय मिळवला असला. तरी मुख्य टूर्नामेंटमध्ये दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याचं आव्हान टीम इंडियाला पेलावं लागणार आहे.

प्रॅक्टिस मॅचेसमध्ये सलग दोन दणदणीत विजय मिळवल्यामुळे धोनी ब्रिगेडचं मनोधैर्य निश्चितच उंचावलं असणार... तर दुसरीकडे आपल्यावरील चोकर्सचा शिक्का पुसण्याकरता डिव्हिलियर्सच्या नेतृत्वाखालील द.आफ्रिकन टीम सज्ज असेल. श्रीलंकेविरूद्ध प्रॅक्टिस मॅचमध्ये बॅट्समन्सनी केलेला खेळ. तर कांगारूंविरूद्ध दुस-या प्रॅक्टिस मॅचमधीस बॉलर्सच्या भेदक कामगिरीने धोनीसह टीम मॅनेजमेंट निश्चितच आनंदात असेल. त्यामुळे द.आफ्रिकेविरूद्ध पहिल्या मॅचकरता प्लेईंग इलेव्हनची निवड करण्याचं आव्हान धोनीसमोर असेल.
प्रॅक्टिस मॅचमधील प्लॉप शो रोहित शर्माला भोवण्याची शक्यता आहे.. ओपनिंगकरता शिखर धवन आणि मुरली विजयचे पर्याय टीम इंडियासमोर आहेत. तर मिडल ऑर्डरमध्ये प्रॅक्टिस मॅचेसमध्ये सेंच्युरी ठोकणारे विराट कोहली आणि दिनेश कार्तिक कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि सुरेश रैनासह प्रतिस्पर्धी टीमची परीक्षा पाहतील. रवींद्र जाडेजा हा स्पेशालिस्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेत खेळताना दिसेल. त्यामुळे द.आफ्रिकन पेस ऍटॅकला आपल्या पूर्ण क्षमतेनिशी मैदानात उतरावं लागेल.

डेल स्टेन, लोनावो त्सोत्सोबे आणि रॉबिन पिटरसनसह अल्विरो पीटरसन आणि मॉर्ने मॉर्केलवर आफ्रिकन टीमची मदार असेल. तुलनेने भारतीय बॉलिंग अननुभवी वाटत असली तरी कांगारूंविरूद्धची कामगिरी हुरूप वाढवणारी नक्की ठरेल... उमेश यादवसह, ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार वेगवान मारा सांभाळतील. तर स्पिनची मदार असेल ती आर. अश्विनवर.
आफ्रिकन बॅट्समन्सना भारतापुढे मोठं आव्हान उभारायचं असल्यास. कॅप्टन डिव्हिलियर्ससह, हाशिम आमला डेव्हिड मिलर आणि कॉलिन इंग्रामला जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे. धोनी ब्रिगेड टूर्नामेंटची विजयी सुरूवात करणार की आफ्रिकन टीम पराभवाचा धक्का देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेलं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 6, 2013 - 12:24
comments powered by Disqus