भारत X विंडीज : भारत : ४५३ रन्सवर ऑल आऊट, ११९ रन्सची आघाडी

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान कोलकाता इथं सुरू असल्या टेस्टमॅचचा आजचा तिसरा दिवस... दिवसाच्या सुरुवातीलाच आर. अश्विननं सेन्चुरी ठोकून क्रिकेट रसिकांच्या दिवसाची आनंदी सुरुवात केली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 8, 2013, 11:52 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान कोलकाता इथं सुरू असल्या टेस्टमॅचचा आजचा तिसरा दिवस... दिवसाच्या सुरुवातीलाच आर. अश्विननं सेन्चुरी ठोकून क्रिकेट रसिकांच्या दिवसाची आनंदी सुरुवात केली. अश्विनची टेस्ट क्रिकेट करिअरमधली ही दुसरी सेन्चुरी ठरली. त्यानंतर थोड्याच वेळात रोहीत शर्मानं त्याचे १५० रन्स पूर्ण केले. त्यामुळे तर प्रेक्षकांत आनंदीआनंदच पसरला.
कोलकाता टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया ४५३ रन्सवर ऑल आऊट झाली आहे. भारतानं २१९ रन्सची महत्त्वपूर्ण आघाडीही घेतली आहे. रोहित शर्माची १७७ रन्सची आणि आर. अश्विनची १२४ रन्सची खेळी भारताच्या इनिंगमध्ये निर्णायक ठरली.

कोलाकाता टेस्टमध्ये रोहित शर्माची डबल सेंच्युरी थोडक्यात हुकली. रोहित १७७ रन्सवर आऊट झाला. रोहित आऊट झाला नसता त्याला डेब्यू टेस्टमध्ये डबल सेंच्युरी झळकावण्याची नामी संधी होती. डेब्यूमध्ये डबल सेंच्युरी झळकावणारा तो पहिला भारतीय ठरला असता. मात्र, तो आऊट झाला आणि चाहते थोडेसे निराश झाले.
दुसरीकडे आर. अश्विननंही १२४ रन्सची झुंजार इनिंग खेळली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी २८० रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनशिप केली. हीच पार्टनरशिप भारताच्या इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं.

पहिल्या इनिंगमध्ये शिखर धवननं २३ रन्स, मुरली विजय २६ रन्स, पुजारा १७ रन्स, सचिन १० रन्स, रोहीत शर्मा १७७, धोनी ४२ रन्स, आर. अश्विन १२४ रन्स, भुवनेश्वर १२ रन्सचं योगदान दिलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.