भारताने मोहाली आणि मालिका जिंकली!

By Prashant Jadhav | Last Updated: Monday, March 18, 2013 - 17:00

www.24taas.com, मोहाली
चेन्नई, हैदराबादपाठोपाठ टीम इंडियानं मोहलीही जिंकली. भारतीय टीमनं कांगारुंवर 6 विकेट्सने मात केली. कांगारुंनं ठेवलेलं 133 रन्सचं टार्गेट टीम इंडियानं 4 विकेट्स गमावून पार केलं. या विजयासह टीम इंडियानं विजयी हॅटट्रिक साधली.
या विजयानंतर चार टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये भारतानं 3-0 नं विजयी आघाडीही घेतली आहे. 187 रन्स करणारा शिखर धवन आणि 153 रन्स करणारा मुरली भारताच्या विजयाचे हिरो ठरले.भारतानं विजय लक्ष्य 3 विकेट गमावून पार केलं.
विजयी हॅटट्रिक साधल्यानंतर आता धोनी अँड कंपनी दिल्ली जिंकत विजयी चौकार मारण्यास प्रयत्नशील असेल. रंगतदार मोहाली टेस्टमध्ये टीम इंडियानं बाजी मारली. या विजयासह टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारतानं चार टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये 3-0 नं विजयी आघाडी घेतली. शिखर धवन आणि मुरली विजय टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

भारताच्या विजयात चार योद्ध्यांची भूमिका महत्वाची ठरली..पहिल्या इनिंगमध्ये मुरली विजय आणि शिखर धवननं केलेली दीडशतकी खेळी करताना भारताला 289 रन्सची विक्रमी ओपनिंग दिली. मुरली विजयनं 153 रन्सची खेळी केली.तर शिखर धवननं 187 रन्सची तुफानी खेळी केली.या दोघांच्या खेळीमुळे भारताची मॅचवर पकड मजबूत झाली.... तर आर अश्विन आणि रविंद्र जाडेजाच्या फिरकीनं कांगारूंना चांगलंच नाचवलं...आर अश्विननं मॅचमध्ये चार विकेट्स घेतल्या.तर जाडेजानंही मॅचमध्ये 6 विकेट् घेतल्या...First Published: Monday, March 18, 2013 - 17:00


comments powered by Disqus