शतकवीर ‘कॉक’ बरळला, भारतीय गोलंदाजीची काढली अब्रू!

By Prashant Jadhav | Last Updated: Saturday, December 7, 2013 - 11:10

www.24taas.com, झी मीडिया, जोहान्सबर्ग
भारतीय गोलंदाजांच्या मार्या त वेगाची कमतरता आहे. त्यातच ते आखूड टप्प्यावर अधिक गोलंदाजी करायचे. भारतीयांच्या गोलंदाजीला डेल स्टेन आणि मोर्ने मोर्केल यांच्या वेगाची सर येऊ शकत नाही. त्यामुळेची मी भारताविरुद्धच्या सलामीच्या लढतीत आरामात शतक झळकावू शकलो, अशा शब्दांत दक्षिण आफ्रिकेचा युवा शतकवीर क्विंटन डिकॉक याने भारतीय गोलंदाजांची अब्रू काढली आहे.
सामनावीर डिकॉक म्हणाला, जोहान्सबर्गमधील वांडर्स हे माझे होमग्राऊंड असल्याने खेळपट्टी माझ्यासाठी नवखी नव्हती. त्यातच भारतीय गोलंदाजांनी दिशाहीन गोलंदाजी केली. फिरकीपटूंना लय मिळविता आली नाही. मी याचा पुरेपूर फायदा उठवीत १२१ चेंडूंत १८ चौकार व ३ षटकारांसह १३५ धावा चोपल्या.
स्टेन आणि मोर्केल हे आमचे वेगवान गोलंदाज १४५ किलोमीटरहून अधिक वेगाने गोलंदाजी करतात. येथील खेळपट्टीवर फलंदाजांना चाप लावण्यासाठी वेगवान मार्याधची गरज असते. भारतीय गोलंदाज येथेच कमी पडले त्यामुळेच आम्ही ३५८ धावांचा डोंगर उभारू शकलो, असेही डिकॉक म्हणाला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, December 7, 2013 - 09:07
comments powered by Disqus