मास्टर ब्लास्टर सचिन मेणाचा!

By Surendra Gangan | Last Updated: Sunday, April 21, 2013 - 08:42

www.24taas.com,सिडनी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मेणाच्या पुतळ्याचे सिडनी क्रिकेट मैदानावर शनिवारी अनावरण करण्यात आले. हा पुतळा सचिनच्या फॅन्सने तयार करून घेतलाय.

येत्या २४ एप्रिलला सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी हा पुतळा सिडनीतील सिनरी ऑफ डार्लिग हार्बर येथील मादाम तुसाँच्या म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी सर डॉन ब्रॅडमन आणि प्रसिद्ध माजी लेगस्पिनर शेन वॉर्नचे पुतळे बसवण्यात आले आहेत.

शतकी खेळीनंतर आनंद व्यक्त करणारा सचिन या पुतळय़ात साकारण्यात आला आहे. पुतळय़ाच्या अनावरणावेळी उपस्थित असलेल्या ‘स्वामी आर्मी’च्या अनेक सदस्यांनी सचिनच्या नावाचा जयघोष केला.
२००३ मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय क्रिकेट चाहत्यांनी ‘स्वामी आर्मी’ची स्थापना केली होती. सिडनी हे सचिनचे एक आवडते मैदान आहे. त्याने या मैदानावर तीन शतके ठोकलीत. त्यातील २००४ मधील २४१ धावांची नाबाद खेळी सचिनची सर्वांच्याच लक्षात आहे.

First Published: Sunday, April 21, 2013 - 08:42
comments powered by Disqus