इंडिया ब्रिगेड श्रीलंकेत दाखल

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, September 12, 2012 - 17:06

www.24taas.com, कोलंबो
कॅप्टन धोनीच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंकेत होणा-या टी-२० वर्ल्ड कपकरता १५ सदस्यीय भारतीय टीम आज श्रीलंकेत दाखल झाली.
आता टी-२० वर्ल्डकप जिंकण्याच्या इराद्यानेच टीम इंडिया लंकेत दाखल झालीय. टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताची सलामीची मॅच होणार आहे ती १९ सप्टेंबर रोजी... अफगाणिस्तानविरूद्ध ही पहिली मॅच रंगेल. कॅप्टन धोनीसह, गंभीर, रैना, सेहवाग, युवी, विराट कोहलीसह रोहित शर्मावर भारतीय बॅटिंगची मदार असणार आहे. युवराजच्या कमबॅकमुळे टिममध्ये नवा उत्साह आहे तर स्पिन डिपार्टमेंटमध्ये वर्षभरानंतर कमबॅक करण्यास आतूर असणारा हरभजन सिंग, आर. अश्विन आणि पियुष चावला जबाबदारी सांभाळतील. फास्ट बॉलिंगमध्ये झहीर खानसह इरफान पठाण, लक्ष्मीपती बालाजी फास्ट बॉलिंगची धुरा सांभाळतील.

First Published: Wednesday, September 12, 2012 - 16:18
comments powered by Disqus